Agripedia

सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस चालू आहे. त्या पावसाचा परिणाम हा कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात होतो. कपाशी पिकाचे पातेगळ होणे, बोंडे सडणे,कपाशी पिवळी होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. त्यातल्या त्यात पातेगळ होणे ही समस्या फारच गंभीर आहे कारण कपाशीच्या पात्यावरच कपाशीचे उत्पादन अवलंबून असते. जर जास्त प्रमाणात पातेगळ झाली तर कापसाचे उत्पादनावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Updated on 31 August, 2021 11:43 AM IST

सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस चालू आहे. त्या पावसाचा परिणाम हा कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात होतो. कपाशी पिकाचे पातेगळ होणे, बोंडे सडणे,कपाशी पिवळी होणे इत्यादी समस्या निर्माण होतात. त्यातल्या त्यात पातेगळ होणे ही समस्या फारच गंभीर आहे कारण कपाशीच्या पात्यावरच कपाशीचे उत्पादन अवलंबून असते. जर जास्त प्रमाणात पातेगळ झाली तर कापसाचे उत्पादनावर वाईट परिणाम होऊ शकतो.

कपाशी वाढीच्या कालावधीमध्ये पात्यांच्या आणि बोंडांची संख्या जास्त झाल्यास जमिनीतून उपलब्ध अन्नसाठा मिळवण्यासाठी दोन शाळांमध्ये स्पर्धा निर्माण होते. त्याचा परिणाम असा होतो की अन्नद्रव्याचा पुरवठा न झाल्यामुळे बहुतेक पाते व बोंडांची गळ होते.

 कपाशी पिकाच्या बोडांवर हवामानाचे घटक, किडींचा प्रादुर्भाव व झाडातील क्रिया इत्यादी घटकांचा परिणाम जास्त होतो.हवामान,तापमानातील चढ-उतार, कमी दिवसात पाऊस होणे किंवा पावसाचा जास्त खंड पडणे इत्यादी बहुसंख्य कारणांमुळे झाडामध्ये तयार होणारे अन्नघटकांचे पात्या, फुले व बोंडे या भागांकडे अन्नघटकांचे हव्या तेवढ्या प्रमाणात वहन होऊ शकत नाही व परिणामी पात्यांची व बोंडांची गळ होत. वाढणाऱ्या तापमानामुळे किंवा उमलणार्‍या फुलांवर पाऊस पडल्यामुळे परागसिंचन आवश्यक त्या प्रमाणात होत नाही.

 तसेच कपाशीचे फुलांवरील किडी इत्यादींमुळे पातेगळ मोठ्या प्रमाणात होते. उशिरा लागवड झालेल्या पिकांमध्ये पाते आणि बोंडे गळण्याचे प्रमाण अधिक असते. अजून बरीचशी कारणे पातळ होण्यासाठी कारणीभूत ठरतात.

 कपाशीची व्यवस्थापन कसे करावे?

 कपाशी लागवड करताना जमिनीत पाणी साचणार नाही तसेच जमिनीतील पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. फुले लागण्याच्या कालावधीमध्ये अधिक तापमान,ढगाळ हवामान किंवा पावसाचा खंड येणार नाही अशा प्रकारे लागवड करणे आवश्‍यक असते.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापना द्वारे आवश्‍यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करावाआणि महत्वाचे म्हणजे फवारणीद्वारे विद्राव्य खतांचा योग्य वापर करावा. कपाशीतील शरीरक्रियात्मक कारणांमुळे होणाऱ्या पातेगळ साठी 20 पीपीएम नेप्ठालीन ऍसिटिक ऍसिड ची फवारणी करणे कधीही चांगली असते.जेव्हा कपाशी पिकाचा पाते लागण्याचा व फुले लागण्याचा कालावधी असतो तेव्हा 2% डीएपी 200 ग्रॅम प्रति 10 लिटर खताची एक दोन वेळा फवारणी करावी.

 

 एनएए आणि डीएपीची फवारणी शक्‍यतो सकाळी करावी. अतिरिक्त खते व संप्रेरकांचा वापर जास्त प्रमाणात केला तर काही वाढ होऊ शकते. अशा वेळीसुद्धा फुलांची गळ होते. कायिक वाढ रोखण्यासाठी वाढरोधकांचा फवारणीद्वारे पाते लागताना वापर करावा. फवारणीद्वारे वॉटर सोलबल खतांचा पुरवठा केल्यास पाते व बोंडे लागण्याच्या अवस्थेमध्ये डीएपी किंवा युरिया खताचे 2% 200 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये  मिसळून फवारणी करावी. यामुळेही पातेगळ आणि बोंड गळ होऊ शकत नाही.पातेगळ आणि बोण्ड गळ थांबवण्यासाठी वरीलप्रमाणे उपाय केले तर निश्चितच आपल्याला  होणाऱ्याआर्थिक नुकसानीपासून  पासून बचाव करू शकतो.

English Summary: management of leaf faal in rain and ccloudy weather
Published on: 31 August 2021, 11:43 IST