Agripedia

मिरची हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भाजीपाला तसेच मसाल्याचे पीक आहे.मिरची उत्पादक शेतकरी एका मोठ्या समस्येने ग्रस्त असतात. ही समस्या म्हणजे मिरची पिकावर लिफ कर्ल व्हायरस चा अटॅक ही होय. या रोगाला महाराष्ट्रातील विविध भागात विविध प्रकारचे नाव आहेत जसे की,चुरडा मुरडा,घुबड्या, बोकड्या इत्यादीनावाने हा रोग ओळखला जातो. हा रोग विषाणूजन्य असून या रोगावर कुठलाही प्रकारचा उपाय नसून हा रोग येऊच नये यासाठी उपाययोजना करणे फार महत्त्वाचे असते.या लेखात आपण या रोगाविषयी तपशीलवार माहिती घेऊ.

Updated on 26 August, 2021 7:59 PM IST

 या रोगाचा प्रसार कसा होतो?

या रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे,मावा, तुडतुडे,पांढरी माशी इत्यादी रसशोषक किडी मार्फत होतो. जेव्हा या किडींचा प्रादुर्भाव मिरचीच्या झाडावर होतो तेव्हा विषाणू रसासोबत कीडीच्या शरीरात प्रवेश करतो.पुढे निरोगी वनस्पतीवर या किडी रस शोषण करताना हा विषाणू निरोगी झाडांमध्ये प्रवेश करतो.

  या रोगाची लक्षणे

 आपल्याला माहीतच आहे की या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मिरचीच्या पानांचा आकार बदलूनती काठा कडून गुंडाळली जातात. मिरचीच्या पाने गुंडाळल्या मुळे झाड बोकडल्यासारखे दिसते. मिरचीचे अशा झाडांना फुले येत नाहीत. त्यामुळे मिरची लागणे चे प्रमाण  फारच कमी होते.

 या रोगाच्या नियंत्रणासाठी करावयाचे एकात्मिक उपायोजना

  • मिरची लागवड करण्यापूर्वी तयार रोपांच्या निर्मितीकरिता वापरण्यात येणारे बियाणे खात्रीशीर व दर्जेदार असल्याची खात्री करावी.
  • रोपवाटिकेच्या चारी बाजूने नेट किंवा कपडा बांधावा.जेणेकरून बाहेरील रसशोषण करणाऱ्या किडी रोपवाटिकेमध्ये येऊ शकणार नाहीत.
  • शक्यतो पुनर्लागवडीसाठी रोपे घरीच तयार करावीत. रोपवाटिकेतून रोपे आनणेशक्यतो टाळावे.
  • अतिरिक्त पाण्याचा आणि अन्नद्रव्यांचा वापर टाळावा.जेणेकरून रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही.
  • शेताच्या चारही बाजूला किंवा मिरची पिकामध्येतीन ओळींनंतर मका,ज्वारी,चवळी इत्यादी सापळा पिकांची लागवड करावी.
  • लागवडीकरिताप्लॅस्टिक मल्चिंगचा वापर केल्यास पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते.
  • मिरची पिकामध्ये तण काढून स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे आहे.
  • रोपवाटिका तयार करताना बियाणे टाकायच्या वेळेस बीजप्रक्रिया केली नसेल तर रोप उगवल्यानंतर 10 मिली डायमिथोएटप्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे.
  • पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी दहा ग्रॅम डायफेनथिरियन ( 50 डब्ल्यू पी)प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • फुल एचडी यांच्या नियंत्रणासाठी 15 मिली फिफ्रोनील( 5 एस. सी)प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • मावा, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी चार ग्रॅम थायमेथोक्झाम किंवा चार मिली इमिडाक्लोप्रिड(17.8 एसएल ) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • दोन फवारणी दरम्यान 10 ते 15 दिवसांचे अंतर ठेवावे.एकाच प्रकारचे कीटकनाशके वापरू नयेत.
  • कोणत्याही  रसायनाची फवारणी करण्या पूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
English Summary: management of leaf curl virous on chilli crop
Published on: 26 August 2021, 07:58 IST