रब्बी हंगामात आपण वेगळ्या प्रकारची पिके लावतो. या लावलेल्या पिकांच्या काढणी झाल्यानंतर जर सिंचनाची सोय असेल उन्हाळ्यात उडीद आणि मुगाची लागवड केली तर नक्कीच फायद्याची ठरते.हे पीक फार कमी कालावधीत येणारी असून अल्प पाण्यामध्ये देखील चांगले उत्पादन घेता येऊन चांगला पैसा हातात येऊ शकतो.
लागणारी जमीन
उन्हाळी उडीद आणि मूग पिकासाठी मध्यम ते भारी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन जर असली तर उत्तम असते.
लागवडीआधी पूर्वमशागत
रब्बी हंगामात लावलेल्या पिकांची काढणी झाल्यानंतर चांगल्या प्रकारे वखराच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी.जमीन भुसभुशीत केल्यानंतर हेक्टरी पाच टनकुजलेले शेणखत टाकावे.
उन्हाळी उडीद व मूग पेरणीची वेळ
उन्हाळी मुगाची लागवड फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी ते मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत करता येते. पेरणी करताना दोन ओळींमध्ये 30 सेंटिमीटर अंतर ठेवावे व दोन रोपांमधील अंतर दहा सेंटिमीटर असावे.पेरणी झाल्यानंतर पिकाला व्यवस्थित पाण्याचा पुरवठा करता यावा त्यासाठी चार ते पाच मीटर रुंदीचे सारे पाडून घ्यावेत.
उन्हाळ्यात लागवड करता येण्याजोगे मूग आणि उडीदाचे सुधारित वाण
- उडीद- उडीदाची उन्हाळ्यात लागवड करायचे असेल तर टी-9,पीडीयू-1 या जाती चांगल्या असतात.
- मुग-उन्हाळी मूगाचे लागवडीसाठी वैभव,पुसा 9531,पुसा वैशाखी या जाती उत्तम असतात.
लागवड करण्याआधी बीजप्रक्रिया
मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा बुटी लावावी.त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धकगुळाच्या थंड पाण्यामध्ये मिसळून बियाण्यावर लावावे.सावलीमध्ये वाळविल्यानंतर पेरणी करावी.रायझोबियम मुळे मुळांवरील गाठींची प्रमाण वाढून नत्राची उपलब्धता वाढते.
खतमात्रा
उडीद व मूग या पिकांना 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे. रासायनिक खते ही चांगले कुजलेले शेणखत त्यासोबत मिसळून बियाणे जवळ पेरणी केल्यास पिकाच्या वाढीस भरपूर प्रमाणात फायदा होतो.
मूग आणि उडीद पिकाची अंतर मशागत
पिकांची पेरणी झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांमध्ये पहिली कोळपणी करून घ्यावी तसेच पहिल्या कापणीनंतर दुसऱ्या कोळपणी साठी दहा ते पंधरा दिवसांचा गॅप द्यावा. कोळपणी पूर्ण केल्यानंतर खुरपणी करून पिके तणमुक्त ठेवावी. पीक तणविरहित ठेवल्याने उत्पादनांमध्ये चांगली वाढ होते.
मूग व उडीद पिकासाठी पाणी व्यवस्थापन
पेरणी केल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली पाण्याची पाळी द्यावी. पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये एकूण पाच किंवा सहा पाळ्या देणे पुरेसे होते.पिकजेव्हा फुलोरा मध्ये येते आणि जेव्हा शेंगा तयार होण्याचा कालावधी असतो तेव्हा पाण्याचा ताण अजिबात पडू देऊ नये.
मूग आणि उडीद पिकाची काढणी
1-मुगाच्या शेंगा 75 टक्के वाळल्यानंतर पहिली तोडणी करावी. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोडाव्यात.
- उडदाची कापणी करून खळ्या वर आणून त्याची मळणी करावी. कारण शेंगा तोडायला फार जिकरीचे काम असून वेळ खर्च होतो.
Published on: 15 December 2021, 01:14 IST