Agripedia

भारतात हिवाळा सुरु होताच फ्लॉवरची मागणी जोर पकडायला लागते. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे फ्लॉवरच्या लागवडीसाठीचा खर्च बघता तो नगण्यच आहे आणि फ्लॉवर पिकातून उत्पादन खूपच चांगले मिळते. त्यातच जर शेतकऱ्यांनी फ्लॉवरच्या सुधारित वाणाची लागवड केली तर उत्पादन अधिक वाढते. भारतात दरवर्षी 6 लाख टनांपेक्षा जास्त फ्लॉवरचे उत्पादन काढले जाते. तसेच दरवर्षी सुमारे 3 हजार हेक्टर क्षेत्रावर फ्लॉवर पिकाची लागवड केली जाते.

Updated on 09 September, 2021 10:33 AM IST

भारतात हिवाळा सुरु होताच फ्लॉवरची मागणी जोर पकडायला लागते. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे फ्लॉवरच्या लागवडीसाठीचा खर्च बघता तो नगण्यच आहे आणि फ्लॉवर पिकातून उत्पादन खूपच चांगले मिळते. त्यातच जर शेतकऱ्यांनी फ्लॉवरच्या सुधारित वाणाची लागवड केली तर उत्पादन अधिक वाढते. भारतात दरवर्षी 6 लाख टनांपेक्षा जास्त फ्लॉवरचे उत्पादन काढले जाते.  तसेच दरवर्षी सुमारे 3 हजार हेक्टर क्षेत्रावर फ्लॉवर पिकाची लागवड केली जाते.

जर आपण आकडेवारी पाहिली तर हे लक्षात येईल की देशात फ्लॉवरची लागवड चांगल्या मोठ्या प्रमाणावर केली जाते. असे असले तरी फ्लॉवरची मागणी देखील खूपच असते त्यामुळे, फ्लॉवरची सुधारित वाण निवडून, शेतकरी फ्लॉवर लागवड करून फायद्याचा सौदा करून घेऊ शकतात. आता आपण फ्लॉवरच्या सुधारित जाती कोणत्या आहेत ते पाहूया

 अर्ली कुमारी

ज्या शेतकऱ्यांना लवकर फ्लॉवर लागवड करण्याची इच्छा असते, त्यांच्यासाठी ही वाण सर्वात फायदेशीर आहे. या जातीची पेरणी मेच्या मध्यावर केली जाते.

 पुसा कार्तिक शंकर

या जातीचे पीक सप्टेंबर महिन्यात तयार होते.  त्याची गणना सुद्धा आगात घेतल्या जाणाऱ्या प्रजातींमध्ये केली जाते. ह्या जातीच्या फ्लॉवरचा आकार मध्यम असतो आणि ही पूर्णपणे पांढरी असते. वजन सुमारे 475 ग्रॅमच्या आसपास असते. उत्पादन हेक्टरी सुमारे 149 क्विंटल पर्यंत देऊ शकते आणि पीक सुमारे 96 दिवसात तयार होते.

पुसा मेघना

ही पण आगात घेतल्या जाणाऱ्या जातींपैकीच आहे. या जातीचे पीक सप्टेंबरमध्ये तयार होते.  त्याची उंची कमी असते आणि त्याचा फैलाव जास्त असतो. फ्लॉवरचे वजन 350 ते 400 ग्रॅम पर्यंत असते. 95 दिवसात विकसित होणारी ही वाण सुमारे 125 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते.

 पुसा शरद

या जातीचे पिक सामान्यता नोव्हेंबरमध्ये तयार होते. फ्लॉवरचे वजन सुमारे 900 ग्रॅम असते.  हेक्टरी उत्पादन सुमारे 240 क्विंटल पर्यंत असते आणि पीक 85 दिवसात तयार होते. 

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा, राजस्थान आणि पश्चिम बंगालच्या भागातील मान्यताप्राप्त जात.

 काला पत्ता

पेरणीसाठी योग्य वेळ ऑक्टोबरच्या मध्यापासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत आहे.  पेरणीनंतर 90 ते 95 दिवसात पिक काढणीसाठी तयार. फ्लॉवर घुमट असते ज्याचे सरासरी वजन 1100 ते 1200 ग्रॅम पर्यंत म्हणजेच एक किलोपेक्षा जास्त असते. प्रति हेक्टर 300 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन.

English Summary: management of culiflower cultivation
Published on: 09 September 2021, 10:33 IST