Agripedia

कोथिंबिरीला वर्षभर मागणी असते त्यामुळे व्यवस्थित नियोजनाने कोथिंबीर लागवड करून हमखास असा नफा मिळवता येतो. या लेखांमधून कोथिंबीर लागवड बद्दल माहिती दिली गेली आहे. कोथिंबीर चा वापर हा घरात , हॉटेलमध्ये लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमात जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोथिंबिरीला वर्षभर चांगली मागणी असते.

Updated on 12 February, 2022 4:59 PM IST

कोथिंबिरीला वर्षभर मागणी असते त्यामुळे व्यवस्थित नियोजनाने कोथिंबीर लागवड करून हमखास असा नफा मिळवता येतो. या लेखांमधून कोथिंबीर लागवड बद्दल माहिती दिली गेली आहे. कोथिंबीर चा वापरहाघरात  , हॉटेलमध्ये लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमात जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोथिंबिरीला वर्षभर चांगली मागणी असते.

कोथिंबीरीची लागवड ही  प्रामुख्‍याने पावसाळी(खरीप) व हिवाळी ( रब्बी ) हंगामात केली जाते. उन्हाळ्यामध्ये कोथिंबिरीचे उत्पादन कमी निघत असले तरी मागणी प्रचंड असल्याने बाजारात चांगला भाव मिळतो त्यामुळे बरेच शेतकरी उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करतात.

 कोथिंबीर लागवड विषयी माहिती

 जमीन :

 कोथिंबीरीच्‍या लागवडीसाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन योग्य असते. परंतु जमिनीत सेंद्रिय खते जास्त प्रमाणात असतील तर हलक्‍या किंवा भारी कसदार असलेल्या जमिनीत देखील कोथिंबीर लागवड करू शकतो.

 हवामान:

 तसे पाहता कोथिंबीरची लागवड ही कोणत्याही हवामानात करता येते परंतु अति पाऊस किंवा अति ऊन असेल तर कोथिंबिरीची वाढ हवी तशी होत नाही.

 आधी सांगितल्याप्रमाणे कोथिंबीरीची वाढ उन्हाळ्यात कमी असते. पण मागणी चांगली असल्याने बाजारात भाव चांगला असतो.त्यामुळे पाण्याची उपलब्धता असेल तर उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करून जास्त नफा मिळवता येतो.

 लागवड पद्धत:

 कोथिंबीरीची लागवड करणे आधी जमीन नांगरून व कुळवून चांगली भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीत एकरी सहा ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.

 त्यानंतर 3×2 मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावे. आपण या वाफ्यात  बी फेकून लागवड करू शकतो. बी फेकून लागवड करताना बी सारखे पडेल याची काळजी घ्यावी. बी फेकून लागवड करायची नसेल तर वाफ्यामध्ये 15 सें.मी. अंतरावर खुरप्याने ओळी पाडून त्यात बी पेरू  शकतो.

उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड करायची असेल तर पेरणी आधीच वाफे भिजवा आणि मग वाफसा आल्यानंतर त्यात बी फेकून किंवा ओळी पाडून त्यात बी टाकून पेरणी करावी.

 कोथिंबीर लागवडीसाठी एकरी 25 ते 35 किलो बियाणे लागते.

 लागवडीआधी धनी हळुवार रगडून  फोडून घ्यावेत.व त्यातील बी वेगळे करावे तसेच पेरणीपूर्वी धन्याचे बी भिजवून मग गोणपाटात गुंडाळून ठेवावे. त्यामुळे उगवण आठ ते दहा दिवसात होते. व कोथिंबीरीच्‍या उत्‍पादनात वाढ होते. त्याच बरोबर काढली देखील लवकर होते.

 सुधारित जाती :

 व्ही 1,व्ही 2,को-1,डी -92,डी- 94, जे 214, के 45, कोईमतुर1,कोईमतुर -2लाम सी.एस 2, लाम सी.एस 4, स्थानिक वान, जळगाव धना, वाई धना या कोथींबीरीच्या, स्थानिक व सुधारित जाती लागवडीसाठी वापरली जातात.

 खत व पाणी व्यवस्थापन :

 कोथिंबीर लागवडीआधी जमिनी एकरी सहा ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे. बी उगवल्यानंतर 20 दिवसांनी हेक्‍टरी 40 किलो नत्र द्यावे. त्यासोबत 25 दिवसांनी 100 लिटर पाण्यात 250 ग्रॅम युरिया मिसळून दोन फवारणी करू शकतो ज्यामुळे कोथिंबिरीची वाढ चांगली होते.

 कोथिंबीर पिकाला नियमित पाणी गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये 5 दिवसांनी आणि हिवाळ्यामध्ये 8-10 दिवसांनी पाणी द्यावे.

कीड व रोग :

 कोथिंबीर पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो कधी कधी मर,भुरीया रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. अशावेळी शिफारशीनुसार भूरी रोगासाठी भुरी प्रतिबंधक वापरू शकतो.तसेच पाण्यात विरघळणारे गंधकवापरावे.

 काढणी व उत्पादन :

 पेरणीनंतर 35 व 40 दिवसांनी कोथिंबीर 15 ते 20 सें.मी. उंचीचे होते. त्यामुळे ती उपटून किंवा कापून काढणी करावी. फिरण्याच्या दोन महिन्यानंतर कोथिंबिरीला फुले यायला सुरुवात होते त्यामुळे त्याआधीच कोथिंबीर काढणे महत्त्वाचे आहे.  पावसाळी आणि हिवाळी हंगामात हिरव्या कोथिंबीरीचे एकरी चार ते सहा टन उत्पादन मिळते. तर उन्हाळी हंगामात हेच उत्पादन 2.5 ते 3.5 टन मिळते.

English Summary: management of corriender crop give short time in more production
Published on: 12 February 2022, 04:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)