Agripedia

नारळाचे झाड हे वर्षानुवर्षे फळ देणारे झाड आहे. 80 वर्षांचे झाल्यानंतरही नारळाचे झाड हिरवेच राहते. हिंदू धर्मातील धार्मिक विधींमध्ये नारळाची फळे वापरली जातात तसेच अनेक भागात नारळाची पाने देखील धार्मिक विधित वापरली जातात. नारळाच्या झाडाला स्वर्गगातील झाड असेही म्हणतात. नारळाच्या झाडाची लांबी 10 मीटरपेक्षा जास्त असू शकते. नारळाचा खोड/कणा पान नसलेला आणि फांदीविरहित असतो.

Updated on 30 August, 2021 6:44 PM IST

नारळाचे झाड हे वर्षानुवर्षे फळ देणारे झाड आहे. 80 वर्षांचे झाल्यानंतरही नारळाचे झाड हिरवेच राहते. हिंदू धर्मातील धार्मिक विधींमध्ये नारळाची फळे वापरली जातात तसेच अनेक भागात नारळाची पाने देखील धार्मिक विधित वापरली जातात. नारळाच्या झाडाला स्वर्गगातील झाड असेही म्हणतात. नारळाच्या झाडाची लांबी 10 मीटरपेक्षा जास्त असू शकते. नारळाचा खोड/कणा पान नसलेला आणि फांदीविरहित असतो.

 

नारळाचे फळ अनेक ठिकाणी वापरले जाते.  कच्च्या नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते तसेच,कच्चा नारळाचा लगदा खाल्ला जातो. नारळाचे फळ पिकल्यावर त्यातून तेल काढले जाते. त्याचे तेल अन्नापासून शरीरापर्यंत आणि शरीरापासून औषधांपर्यंत वापरले जाते. यावेतिरिक्त नारळ हे खूपच गुणकारी आहे, नारळाचा जूट जाळून आणि गरम पाण्यात मिसळून, ताप असलेल्या रुग्णाला ते दिल्याने त्याची तहान भागते.

जळजळ, अतिसार, सर्दी अशा अनेक आजारांमध्ये नारळाचा वापर फायदेशीर आहे.  जस्त सर्वात जास्त प्रमाणात नारळामध्ये आढळते. ज्यामुळे नारळाच्या सेवणाने लठ्ठपणाच्या आजारातून मुक्तता मिळते.  त्वचेशी संबंधित आजारांमध्येही नारळाचा वापर केला जातो.

 

 

 

 

 

उपयुक्त हवामान

समुद्राच्या किनाऱ्यावर नारळाची लागवड केली जाते. याशिवाय खारट माती असलेल्या ठिकाणीही त्याची लागवड करता येते.  उष्णकटिबंधीय आणि उप उष्णकटिबंधीय हवामान नारळाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य आहे. त्याच्या लागवडीला जास्त पाणी लागत नाही. भारतात याची लागवड केरळ, महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि किनारपट्टी भागात केली जाते.

नारळाच्या लागवडीसाठी उबदार आणि उप-उष्णकटिबंधीय हवामान आवश्यक आहे.  नारळाच्या लागवडीसाठी हवेची सापेक्ष आर्द्रता अधिक महत्त्वाची आहे. नारळाच्या लागवडीसाठी, हवेची किमान सापेक्ष आर्द्रता 60 टक्क्यांपर्यंत असावी. कारण जर सापेक्ष आर्द्रता यापेक्षा कमी असेल तर त्याच्या फळांमध्ये गुणवत्तेचा अभाव राहील. नारळाच्या फळांना पिकण्यासाठी योग्य उबदार हवामान आवश्यक असते.

नारळाच्या लागवडीसाठी सामान्य तापमान आवश्यक असते. सामान्य तापमानात, वनस्पती मुबलक प्रमाणात फळे देते. आणि फळांची गुणवत्ता देखील खूप चांगली असते.  नारळाची लागवड अशा ठिकाणीही करता येते जिथे तापमान हिवाळ्यात किमान 10 अंश आणि उन्हाळ्यात जास्तीत जास्त 40 अंश (पण सलग high temperature राहायला नको)

 

नारळासाठी आवश्यक जमीन

रेताड चिकणमाती असलेली जमीन नारळाच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते.  वालुकामय चिकणमाती व्यतिरिक्त, नारळ चांगले पाणी धारण आणि निचरा करत असलेल्या जमिनीत सहज पिकवता येते.पण जमिनीच्या खाली लगेच कोणताही खडक नसावा म्हणजेच काळ्या आणि खडकाळ जमिनीत त्याची लागवड करता येत नाही. दळच्या जमिनीत लागवड करता येते कारण नारळाची मुळे लांब जातात आणि दळ असलेल्या जमिनीत ती खोलवर जाऊ शकतात; तर काळी आणि खडकाळ जमीन कठीण असते यामुळे मुळे जमिनीत खोलवर जाऊ शकत नाहीत. नारळ लागवडीसाठी जमिनीचा पीएच  मूल्य 5.2 ते 8.8 पर्यंत असावा.

 

 

 

 

 

 

 

लागवडी पूर्वमशागत

शेतात नारळाची रोपे लावण्यासाठी प्रथम शेत व्यवस्थित नांगरून तयार केले जाते. नांगरणी केल्यानंतर, शेतात फळी मारून जमीन समतल बनवा जेणेकरून पावसाळ्यात शेतात पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. त्यानंतर शेतात 20 ते 25 फूट अंतर ठेवून एक मीटर लांब, रुंद आणि खोल खड्डे करा; शेतात एका रांगेत सर्व खड्डे करा.  ओळींमध्ये 20 ते 25 फूट अंतर असावे.

 

 

 

 

 

लागवडीचा हंगाम

खड्ड्यात नारळाचे रोप लावण्याची उत्तम वेळ जून ते सप्टेंबर आहे. पण जेव्हा या काळात मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा त्याची लागवड करू नये. कारण मुसळधार पावसाच्या वेळी त्याची लागवड केल्यास झाडे मरण्याची समस्या अधिक वाढते.जिथे पाण्याची योग्य व्यवस्था आहे तिथे पावसाळ्याच्या एक महिना आधी लागवड करता येऊ शकते. पावसाळी हंगामात ज्या ठिकाणी पावसाळ्यात पूर येण्याची दाट शक्यता असते तेथे पावसाळ्यानंतर त्याची लागवड करने सर्वात योग्य आहे.

 

 

 

 

 

लागवड कशी करणार?

खड्ड्यांमध्ये नारळाची लागवड करण्यापूर्वी, खड्ड्यांमध्ये योग्य प्रमाणात जुने शेणखत किंवा कंपोस्ट टाका आणि काही दिवस उघडे ठेवा त्यानंतर त्यात हलकी माती घालून मिक्स करावे; जेव्हा ही माती आणि शेण पुरेसे कठीण होते, तेव्हा खुरप्याच्या मदतीने खड्ड्यांच्या मध्यभागी एक खड्डा तयार करा; ज्यामध्ये नारळाच्या रोपाची बियाणे सहज येऊ शकतात.

खड्ड्यात बी लावल्यानंतर त्यात माती टाका आणि सर्व बाजूंनी दाबा. माती दाबताना लक्षात ठेवा की रोपाचे बी दोन ते तीन सेंटीमीटर बाहेर दिसले पाहिजे. खड्ड्यात रोप लावल्यानंतर खड्ड्यातून बाहेर काढलेल्या मातीपासून खड्ड्याभोवती काही अंतरावर वर्तुळ बनवा.  त्याची माती चांगली दाबा जेणेकरून शेतातील पाणी जास्त पावसामुळे खड्ड्यांमध्ये भरणार नाही. कारण खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने झाड लवकर खराब होते.

शेतात नारळाची लागवड करताना, जर शेतात पांढऱ्या मुंग्याचा प्रादुर्भाव दिसला, तर लहान खड्ड्यात बियाणे लावण्यापूर्वी, 5 ग्रॅम सेविडॉल 8G टाकून मातीवर प्रक्रिया करा.  असे केल्याने झाडाला पांढऱ्या मुंग्यांच्या उद्रेकापासून वाचवता येते.

 

 

 

 

 

पाणी व्यवस्थापन

शेतात रोप लावल्यानंतर सुमारे तीन ते चार वर्षे रोपाची चांगली काळजी घ्यावी लागते. या दरम्यान, झाडांना जास्त थंडी आणि जास्त उष्णतेपासून वाचवायला हवे. नारळाच्या झाडाला सुरुवातीला वाढण्यासाठी योग्य प्रमाणात हवेची गरज असते.यासाठी मुळांजवळ असलेले तीन ते चार सेंमी क्षेत्र दोन ते तीन वर्षे मातीने झाकले जाऊ नये.

नारळाच्या वनस्पतीच्या उंच आणि संकरित प्रजातींना जास्त पाणी लागत नाही तर ; बौने प्रजातींना जास्त पाणी लागते. अपारंपारिक भागात फक्त उंच आणि संकरित झाडे लावली जाऊ शकतात. जर या प्रजातीची झाडे पावसाळ्यात शेतात लावली गेली तर त्यांच्या सुरुवातीला पाण्याची गरज नाही.परंतु जर त्याचे रोप पावसाळ्यापूर्वी किंवा नंतर लावलेले असेल तर त्यांना तत्काळ पाणी द्यावे. त्यानंतर, ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, रोपाला वेळो-वेळी पाणी द्यावे.

ठिबक पद्धत सर्वोत्तम आणि नारळाच्या झाडांना पाणी देण्यासाठी योग्य आहे. कारण ठिबक सिंचन पद्धतीद्वारे झाडाला योग्य प्रमाणात पाणी मिळते. ज्यामुळे झाड चांगले विकसित होते आणि उत्पादनात फरक पडतो. उन्हाळी हंगामात, झाडाला तीन दिवसांच्या अंतराने पाणी देणे आवश्यक आहे. तर हिवाळ्यात, आठवड्यातून एकदा पाणी देणे पुरेसे असते.

 

 

 

 

English Summary: management of coconut farming
Published on: 30 August 2021, 06:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)