महाराष्ट्रात उन्हाळी हंगामात प्रामुख्याने भेंडी, गवार,टोमॅटो, वांगी, चवळी,कारले दुधी भोपळा इत्यादी भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु उन्हाळी हंगामात या भाज्यांचे योग्य नियोजन केले तर उत्पादनात चांगल्या पद्धतीचे वाढ होते.
या लेखात आपण उन्हाळी हंगामात काही भाज्यांचे लागवडीचे नियोजन कसे करावे याबद्दल माहितीघेऊ.
उन्हाळी हंगामात या भाज्यांचे अशा पद्धतीने करा योजना
1-मिरची, वांगी आणि टोमॅटो- या तिने पिकांची रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादी वाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यातरोपांची लागवड केली जाते. या पिकांमध्ये विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांचा प्रसार करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी दक्ष राहावे.
- मिरचीची लागवड करते वेळी तिचे उत्पादन मार्च ते मे महिन्यात बाजारात येईल असे करावे. लागवडीसाठी वाण उंच शाकीय वाढणारा, फांद्या जास्त असणारा, पोपटी ते गर्द हिरव्या रंगाच्या लांब मिरच्यांचा असावा.मिरचीमध्ये फुले ज्योती या जातीमध्ये मिरच्या झुपक्यात येतात व झाडावर दाट पाने असतात.
- वांगी या पिकासाठी उंच व डेरेदार वाढ असणारा काटेरी देठ,जांभळ्या,पांढऱ्या व हिरव्या रंगाची छटा एकत्र असणाऱ्या चकाकिदारगोल किंवा उभट गोल फळे येणाऱ्या वाणाची निवड करावी. वांग्यामध्ये रंग व आकार यानुसार भाग निहाय विविधताआढळून येते.वांगी पिकास शेणखत व रासायनिक खते यांचा संतुलित वापर करावा.उन्हाळी हंगामात योग्य वेळी पाणी द्यावे.फळांची तोडणी पाच ते सहा दिवसांनी करावी.चांगली,एक सारखी फळे बाजारात पाठवावी.
- टोमॅटो पिकासाठी वाण निवडताना प्रामुख्याने तो वाण अधिक पाणी असणारा,उष्ण हवामानात फळधारणा होणारा,लिफ कर्ल व्हायरस या रोगास सहनशीलव फळांना तडे न जाणारा निवडावा. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी.कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी होते.
कोथिंबीर
कोथिंबीर पिकास कोरडे हवामान मानवते. उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबीरीचे पीक कमी कालावधीतचांगले पैसे देऊन जाते. कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावे.दर आठ दिवसाच्या अंतराने कोथिंबिरीची लागवड करावी.
भेंडी आणि गवार
उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भेंडी व गवार या भाज्यांना मागणी सुद्धा भरपूर आहे. भेंडी लागवड करते वेळी हळदी रोगास प्रतिकारक्षम परभणी क्रांती, अर्का अनामिका,पुसासवानी,पंजाब पद्मनी या वाणाची निवड करावी.गवारी साठी पुसा सदाबहार,उसा नवबहार यासारख्या भरपूर उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी.उन्हाळ्यात या पिकांना पाणी वेळेवर द्यावीत.या पिकांचे तोडणी संध्याकाळच्या वेळेस करावी.
Published on: 04 December 2021, 01:12 IST