Agripedia

तळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या प्रतीवर अवलंबून असते पाण्याची प्रत म्हणजे पाण्याचा सामू, आम्लता, जडपणा, विरघळलेल्या वायूंचे प्रमाण, प्लवंगसंख्या इ. प्रमाणेच पाण्याची खोलीही महत्वाची असते. सर्वसाधारणपणे कार्पस् संवर्धनाकरीता पाण्याची खोली एक ते अडीच मिटर एवढी ठेवतात.

Updated on 17 November, 2021 8:40 PM IST

शेत तळ्यात पाणी सोडताना पाण्याच्या पाइपच्या तोंडावर बारीक जाळी बसविणे आवश्यक असते. त्यामुळे स्थानिक मासे किंवा त्यांची पिल्ले पुन: तळयात येणार नाहीत. पाण्याचा झोत तळयात पडताना जोर कमी व्हावा म्हणून तोंडाशी जाड पत्रा बसवतात जेथे पाणी पडते तेथे गवत लावलेले असते किंवा दगडी घडीव फरशा टाकलेल्या असतात. त्यामुळे तळाशी खड्डा पडणे थांबते.

पाण्यातील कीटकांचे नियंत्रण

मत्स्यबीज सोडण्यापूर्वी पाण्यातील कीटक आणि इतर शत्रुंचा नाश करणे आवश्यक असते पाण कीटकांमध्ये प्रामुख्याने पाणनावाडी, पाण ढेकूण, पाणविंचू, रानाट्रा (वॉटर बग्ज) तसेच भिंगरी किंवा चतुर (ड्रॅगन लार्ज) येतात. हे कीटक माशांच्या बीजावर हल्ला करून त्यांना मारून टाकतात. त्याचप्रमाणे वाढणाऱ्या माशांच्या अवस्थांशी ते अन्नासाठी स्पर्धा करतात.

किटकांचा नाश करताना तेल, साबण एकत्र मिसळून त्यांचे दुधासारखे मिश्रण वापरतात. मत्स्यबीज सोडण्यापूर्वी १२ ते १४ तास आधी ते वापरतात. हेक्टरी ६० कि.ग्रॅम तेल आणि २० कि.ग्रॅ. साबण यांचे मिश्रण लागते. प्रथम साबण पाण्यात विरघळवितात आणि ते पाणी तेलात ओततात. दोन्ही चांगले ढवळून एकजीव केले जाते आता भुरकट करडे रसायन तयार होते हे रसायन पाण्याच्या पृष्ठभागावर पसरून घ्यावे. पाण्यावर या रसायनाचा अतिपातळ थर तयार होतो. काही मिनिटात पाणकीटक प्राणवायू न मिळाल्यामुळे मरू लागतात.

 

बोटूकली साठवणूक

शेततळ्यातध्ये साधारणपणे सुमारे ७५ ते १०० मीमी आकाराच्या बोटुकलींची साठवण करतात. साधरणपणे यामध्ये हेक्टरी १२००० ते १५००० बोटुकली सोडता येतात.

साठवणुकीचा दर हा तलावाच्या पाण्याच्या पातळीवर आणि तलावातील प्राणवायूवरही अवलंबून असतो.

खाद्य व्यवस्थापन

मत्स्य बोटुकली तलावात सोडल्यावर त्यांना खाद्याची गरज असते. तळ्यातील पाण्यात प्लवंग योग्य त्या प्रमाणात आहेत याची खात्री झाल्यावरच मत्स्यबीज सोडावे.

मत्स्यबीज उपाशी असते म्हणून अन्न उपलब्ध असेल तर लगेच खायला सुरूवात करते. तळ्यात प्लवंगाचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून बीजाला अन्नाची कमतरता पडू नये म्हणून बीजसोडल्यावर दर आठवडयाला एका गुंठयाला १० किलो ताजे शेण व अर्धा किलो सुपर फॉस्फेटचा वापर सुरू करावा. तसेच वनस्पती प्लवंग बेसुमार वाढले तर खताचा वापर बंद करावा. खाद्य व्यवस्थापन हे शेततळ्यांमधील उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावते.

माशांना पूरक खाद्य म्हणून भाताचा कोंडा, शेंगदाणा पेंड याचा वापर केला जातो सुरुवातीच्या कालावधीमध्ये वाढ जास्त असल्याने माशांना जास्त प्रमाणात खाद्य पुरविणे आवश्यक असते. कालांतराने जसजसे वाढीचे प्रमाण कमी होत जाते त्याप्रमाणे खाद्याचे प्रमाण कमी केले जाते. याशिवाय तयार केलेले खाद्यही माशांना पुरविले जाऊ शकते. या खाद्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निगध पदार्थ यांसारखे घटक माशांच्या वाढीस पूरक ठरतील अशा प्रमाणात मिसळलेले असतात व हे खाद्य विविध आकारामध्ये (१ ते ५ मीमी) उपलब्ध असते.

पाणी व्यवस्थापन

तळयातील बीजाची वाढ ही मुख्यत्वे पाण्याच्या प्रतीवर अवलंबून असते पाण्याची प्रत म्हणजे पाण्याचा सामू, आम्लता, जडपणा, विरघळलेल्या वायूंचे प्रमाण, प्लवंगसंख्या इ. प्रमाणेच पाण्याची खोलीही महत्वाची असते. सर्वसाधारणपणे कार्पस् संवर्धनाकरीता पाण्याची खोली एक ते अडीच मिटर एवढी ठेवतात.

सुधारित किंवा निमसुधारित पध्दतीमध्ये माशांची विष्ठा सतत पाण्यामध्ये पडत असते त्याचबरोबर जास्त प्रमाणात टाकलेले खाद्य तलावाच्या तळावर साचते व कुजून पाणी दुषित होते. अशावेळी पाण्याची प्रत खराब होऊ नये म्हणून ठराविक अगर योग्य वेळी पाणी बदलणे आवश्यक ठरतेण्तलावाच्या पाण्यात सेंद्रिय पदार्थ कुजणे, वनस्पती प्लवंगाची बेसुमार वाढ, ढगाळ हवामान इ. कारणांमुळे पाण्यातील प्राणवायू कमी होण्याची शक्यता असते.

विरघळलेला प्राणवायू कमी झाल्यामुळे मासे पृष्ठभागाजवळ येवून हवेतील प्राणवायू घेण्यासाठी धडपड करतात आणि प्राणवायू मिळण्याची क्षमता नसल्यामुळे मरू लागतात अशावेळी ब्लोअर्समधून किंवा हवेच्या सुधारित यंत्राचा उपयोग करून पाण्यातील प्राणवायू विरघळण्याचे प्रमाण वाढवू शकतो. सेंद्रिय पदार्थ पाण्यामध्ये कुजत असेल तर ते काढून टाकावे. प्रखर उन्हाळयामुळे पाणी बाष्पीभवन क्रियेमुळे खुप कमी होते त्यामुळे खोली कमी झाल्यामुळे ते उष्णतेने लवकर तापते. हे तापमान सहन न झाल्याने व प्राणवायू कमी असल्याने मासे मरू लागतात.

Softness यावेळी पूर्वी बांधावर लावून ठेवलेल्या झाडांच्या सावलीचा उपयोग तापमान न वाढू देण्याकडे होऊ शकतो पाण्याला गढूळपणा मातीच्या सूक्ष्मकणांमुळे आला असेल तर माशांच्या श्‍वसनाचेवेळी पाणी कल्ल्यावर जातांना मातीचे कण, प्लवंग कल्ल्यात अडकून श्‍वसनाला अडथळा निर्माण होऊन मासे गुदमरून मरतात. यासाठी पाणी ढवळले जाणार नाही याची काळजी घ्यावी.

संकलन - प्रवीण सरवदे, कराड

English Summary: Management of carp fish in the field
Published on: 17 November 2021, 08:40 IST