वांगी पिकाचे मूलस्थान भारत असून भारतातील बहुतेक राज्यांमध्ये वांग्याची लागवड केली जाते.वांग्याचे आरोग्यासाठीही बरेच फायदे आहेत. वांग्यामध्ये खनिजे तसेच अ,ब,कही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात व लोह व प्रथिनांचे प्रमाण देखील चांगले असते.
महाराष्ट्रात विविध भागांच्या आवडीनुसार वांग्याच्या वेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. सांगली आणि सातारा भागाचा विचार केला तर इकडे कृष्णाकाठची वांगी प्रसिद्ध आहेत.अहमदनगर, पुणे व सोलापूर भागात काटेरी किंवा डोरली वांगी पसंत केले जातात. जळगाव जिल्ह्यात भरिताची वांगी लोकप्रिय आहेत.वांगी पिकाला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो.परंतुत्यासाठी योग्य वाणाची निवड करणे गरजेचे असते. वाण निवडताना तो भरपूर उत्पादन देणारा आणि रोग आणि कीड यांना कमी प्रमाणात बळी पडणारा असावा.लागवड करताना प्रामुख्याने सुधारित व संकरित जातींची निवड करावी. वांगे लागवडीमध्ये रोपवाटिका व्यवस्थापन मला फार महत्त्व आहे. या लेखात आपण वांगी पिकाच्या रोपवाटिकेची व्यवस्थापन कसे करावे? याबद्दल माहिती घेऊ.
वांगी पिकाचे रोपवाटिका
- वांगी पिकाची रोपे तयार करण्यासाठी तीन बाय दोन मीटर आकाराचे गादी वाफे तयार करून एक मीटर रुंद व 15 सेंटिमीटर उंच करावी.गादी वाफ्यांमध्ये चांगले कुजलेलेशेणखत प्रति वाफा दोन पाट्या टाकावे.खत आणि माती यांचे योग्य मिश्रण करून घ्यावे व गादीवाफ्यात समप्रमाणात पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी.रोपामध्ये मर रोग येऊ नये यासाठी प्रति वाफ्यात 30 ते 40 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड वापरावे.
- वाफ्याच्या रुंदीशी समांतर दहा सेंटिमीटर अंतरावर खुरप्याने एक ते दोन सेंटीमीटर खोलीच्या ओळी करून त्यात पातळ बी पेरावे.सुरुवातीला वाफ्याना झारीने पाणी द्यावे. रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी प्रत्येक वाफ्यास50 ग्रॅम युरिया आणि 15 ते 20 ग्रॅम फोरेट दोन ओळींमध्ये काकरी पाडून घ्यावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे.कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी दहा दिवसांच्या अंतराने शिफारसीनुसार कीडनाशकांची फवारणी करावी.
- लागवडीपूर्वी रोपांना थोडा पाण्याचा ताण द्यावा म्हणजे रोप कणखर बनते.लागवड करण्याआधी एक दिवस रोपांना पाणी द्यावे. रोप लागवडीसाठी पाच-सहा आठवड्यात तयार होते. रोपे 12 ते 15 सेंटिमीटर उंचीचे झाल्यावर लागवड करावी.
वांगे रोपांची पुनर्लागवड
लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करावी व शेणखत मिसळावे.जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सरी वरंबे पाडावेत. हलक्या जमिनीत 75× 75 सेंटीमीटर लागवडीचे अंतर तर जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातींसाठी 90× 90 सेंटिमीटर अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळ्या कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जातींसाठी 90 बाय 75 सेंटीमीटर जास्त वाढणार्या जातीसाठी 100 × 90 सेंटिमीटर अंतर ठेवावे.
Published on: 06 December 2021, 01:07 IST