अवकाळी पावसाचा फटका व वातावरणाचा बदल यामुळे शेती व्यवसायाला चांगलाच जोराचा फटका बसला आहे. या अवकाळी मुळे खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अवकाळीमुळे फळबाग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, शिवाय रब्बी हंगामातील कांदा देखील यामुळे चांगलाच प्रभावित झाला आहे.
कांदा हे एक नगदी पीक म्हणुन ओळखले जाते, खरीप हंगामातील लाल कांदा अनेक भागात काढायला सुरवात झाली आहे मात्र आताच लागवड केलेला रब्बी हंगामातील कांदा हा अजून वावरातच आहे, या कांद्याला नुकत्याच पडलेल्या अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. ह्या बेमौसमी पावसामुळे कांदा पिकावर अनेक बुरशीजन्य रोग जसे कि करपा इत्यादी चाल करतील त्यामुळे कांदा पिकाचे योग्य नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील कांदा पिकाचे कसे व्यवस्थापन करणार हा मोठा प्रश्न पडला असेल. शेतकऱ्यांच्या ह्याच प्रश्नाचे उत्तर आज आपण या लेखात जाणुन घेणार आहोत.
पाऊस उघडला कि काय करणार
अवकाळी पाऊस उघडला कि सर्वप्रथम हवामानाचा अंदाज घेण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिक देत आहेत. पाऊस उघडला म्हणुन लगेच फवारणी केली आणि लगेच पावसाने हजेरी लावली तर औषध साठी आलेला खर्च वाया जाईल शिवाय त्यासाठी आलेले श्रम देखील व्यर्थ आहे.
म्हणुन पाऊस उघडला कि दोन ते तीन दिवसात फवारणी करावी, फवारणी करताना पावसाचा अंदाज घ्यावा. आणि पाऊस उघडताच लगेचच फवारणी केली तर अशी फवारणीमुळे पिकाला फायदा पोहचत नाही, कारण कि जमिनीत आधीच पाणी असते त्यामुळे औषधंचा पाहिजे तेवढा फायदा पिकाला होत नाही.
करपा आणि बुरशीजणीत रोगांचा कांद्यावर हल्ला
अवकाळी मुळे सर्वात जास्त कांदा पीक हे करपा मुळे ग्रसित झालेले बघायला मिळत आहे.
करपा शिवाय कांद्याची पात पिवळी पडत आहे जर असे असेल तर ते बुरशीजणीत रोगांचा परिणाम आहे असे समजावे. म्हणुन पावसाची उघडीप झाली कि, बुरशीनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला कृषी वैज्ञानिकांनी दिला आहे, तसेच लिक्विड फॉर्म मधल्या बुरशी नाशकाचाच वापर करावा असे सांगितलं जात आहे. कांदा हे एक कमी वेळेत येणारे नगदी पीक आहे त्यामुळे याची योग्य ती काळजी घेतली नाही तर याचा उत्पादनावर मोठा परिणाम होतो असे सांगितले जाते, म्हणुन पाऊस उघडला कि या पिकाला फवारणी करावी.
Published on: 03 December 2021, 09:21 IST