सध्या अनेक शेतकरी सेंद्रिय पद्धतीच्या शेतीकडे वळत आहेत. सेंद्रिय शेती म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्नाविषयी तडजोड करावी लागते. परंतु आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर सेंद्रिय शेती खूप फायद्याचे आहे. सध्या दिवसेंदिवस सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पिकांना किंवा शेतमालाला खूप मागणी वाढत आहे.
सेंद्रिय शेतीमध्ये सगळीच कामं नैसर्गिक पद्धतीने होत असतात.यामध्ये पिकांची वाढ, पिकांवर येणारी रोगराई इत्यादी सेंद्रिय औषधाने दूर केली जाते.यामध्ये अनेक कीटकनाशके आणि बुरशीनाशके हे सेंद्रिय पद्धतीने बनवली जातात.याच कीटकनाशक आतील एक सेंद्रिय प्रकार म्हणजे निंबोळी अर्क हा होय. या लेखात आपण निंबोळी अर्क कसा बनवतात व त्याचे फायदे याविषयी माहिती घेऊ.
निंबोळी अर्क बनवण्याची पद्धत
निंबोळी अर्क हे कडूनिंबाच्या झाडाच्या पाना पासून मिळणाऱ्या निंबोळी पासून बनवण्यात येते. अशा पद्धतीने निंबोळी अर्क बनवतात.
- पाऊस सुरू होण्याच्या काळात निंबोळ्या जमा करून ठेवावेत किंवा बाजारातही आपल्याला निंबोळी मिळतात.
- जमा केलेल्या निंबोळी व्यवस्थित साफ कराव्या त्यानंतर वाळवाव्या आणि साठवून ठेवाव्यात.
- फवारणी करण्याच्या आधीच्या दिवशी आवश्यकता असेल तितकी निंबोळी कुटून बारीक करून घ्यावे.
- त्यानंतर तो बारीक केलेला चुरा पाच किलो चुर्यात नऊ लिटर पाणी टाकावे. साधारण नऊ लिटर पाण्यात भिजत घालावा. याच बरोबर एक लिटर पाण्यात 200 ग्रॅम साबणाचा चुरा वेगळाभिजत घालावा.
- दुसऱ्या दिवशी सकाळी लाकडी काठीने हे द्रावण दुधासारखे दिसेपर्यंत ढवळा.
- द्रावण गाळून झाल्यावर निंबोळी अर्क स्वच्छ फडक्यातून गाळून घ्यावे. या अर्कात एक लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळावे. हा सर्व अर्क दहा लिटर होईल एवढे पाणी टाकावे.
निंबोळी अर्क फवारणी चे फायदे
- आपण पिकावरील विविध किडी च्या मादीस अंडी घालण्यापासून प्रतिबंधित करता येते.
- कीटकांवर आंतरप्रवाही कीटकनाशक प्रमाणे निंबोळी अर्क कार्य करते.
- निंबोळी अर्क विविध प्रकारच्या किडीस खाद्य प्रतिबंधक म्हणून वापरता येते. उदा.पांढरी माशी, मिलीबग, लष्करी आळी, तुडतुडे, फुलकिडे आणि उंटअळी इत्यादी.
- कडुनिंबातील ऐझाडेरीक्टिन घटक कीटकांच्या वाढीस प्रतिबंध करते.
- निंबोळी अर्क बनवण्यासाठी कमी खर्च येत असल्यामुळे आपला उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते.
निंबोळी अर्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- कडूलिंबाच्या पूर्णपणे सुकलेल्या निंबोण्या – पाच किलो
- 100 लीटर चांगले व स्वच्छ पाणी
- 100 ग्रॅम धुण्याची पावडर
- गाळण्यासाठी कापड
Published on: 26 October 2021, 10:51 IST