Agripedia

शेतामध्ये बऱ्याच पिकांच्या काढणीनंतर त्याचे अवशेष शिल्लक राहतात. ते उरलेले अवशेष आपण शेतांमध्ये जाळून टाकत असतो. परंतु या अवशेषांमध्ये शेतीला आवश्यक असणारे बरेच गुणधर्म समाविष्ट असतात. असाच काही प्रकार सोयाबीन पिकाच्या बाबतीत ही घडतो.

Updated on 03 November, 2021 10:48 AM IST

शेतामध्ये बऱ्याच पिकांच्या काढणीनंतर त्याचे अवशेष शिल्लक राहतात. ते उरलेले अवशेष आपण शेतांमध्ये जाळून टाकत असतो. परंतु या अवशेषांमध्ये शेतीला आवश्यक असणारे बरेच गुणधर्म समाविष्ट असतात. असाच काही प्रकार सोयाबीन पिकाच्या बाबतीत ही घडतो.

आता बर्‍याचशा प्रमाणात सोयाबीन काढण्याचे काम संपत आले आहे.सोयाबीन काढणीनंतर सोयाबीनचे कुटार शिल्लक राहते. त्यामुळे बर्‍याच शेतकऱ्यांपुढे प्रश्न असतो की या कुटाराचे  काय करावे? या सोयाबीनच्या कोठारा पासून कंपोस्ट खत तयार करता येते.याबाबत या लेखात आपण सविस्तर माहिती घेऊ.

सोयाबीन कुटारापासून कंपोस्ट खत निर्मिती

 ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीनच्या कुटाराचे मोठे मोठे ढीग पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी शेतातून सोयाबीन कुटार खरेदी करून साठवणूक केली जात आहे.एक कुटारट्रक च्या सहाय्याने पुणे,औरंगाबाद अशा ठिकाणीपाठवले जात आहे. या ठिकाणी या कुटाराच्या उपयोग मशरूम उगवण्यासाठी तर काही ठिकाणी भट्टीमध्ये जाण्यासाठी, वीटभट्टी मध्ये अशा प्रत्येक ठिकाणी सोयाबीन कुटार वापरात आणले जात आहे.

 परंतु या कुटार विक्रीच्या माध्यमातून खूपच कमी पैसा मिळतो. एका ट्रॅक्टरला तीनशे ते पाचशे रुपये तर काही शेतकरी हा कुटार पेटवून देतात. ज्यामुळे संपर्कात आलेली जमीन निर्जीव होते.

अशा पद्धतीने करू शकता सोयाबीन कुटारचा वापर

जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कडे किंवा कृषी औषध विक्रेत्यांकडे वेस्ट डी कंपोजर सहज मिळून जाते. हे वेस्ट डी कंपोजर आणल्यानंतर ते 200 लिटर च्या टाकीतटाकून त्यामध्ये दोन किलो गूळ आणि पाणी हे मिश्रण सात दिवस सावली ठेवायचे. दररोज त्यालापाच मिनिट हलवायचे

या माध्यमातून सातव्या दिवशी पिवळट असे द्रावण तयार होते. हे तयार पिवळट द्रावण पाण्यात मिसळून सोयाबीन कुटारावर शिंपडले तर यातून अडीच ते तीन महिन्यात उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत तयार होते. जे शेतीसाठी व जमिनीसाठी उत्तम आहे व पिकांना पोषक आहे.

English Summary: making process of compost fertilizer from soyabion crop remnents
Published on: 03 November 2021, 10:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)