आज शेतकरी चा प्रमुख उद्देश म्हणजे उत्पन्न वाढवणे व त्यासाठी तो वेगवेगळे प्रक्रिया करत असतो सर्वात जास्त प्रमाणात रासायनिक ( Chemical Fertilizers)खतांचा वापर शेतकरी करत असतो व त्यामुळे जमिनीला हानी होत असते. सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे कारण ती एक काळाची गरज आहे.सेंद्रिय खतांन मधे कोंबडी खत आहे उत्तम पर्याय आहे.कोंबडी खते वापरल्याने मातीची भौतिक,रासायनिक व जैविक क्षमता सुधारते व त्यामुळे पोषक ( Nutritive) तत्त्वांची वाढ होते. या खतांमुळे पिकांची चांगल्या पद्धतीने वाढ होते व पीकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. नैसर्गिक खतामुळे रासायनिक खतांचे वापर कमी होतो व त्यामुळे पैसेही वाचले जातात.
कोंबडी खताचा विचार केला तर या खताची प्रत ही कोंबडीची जात,वापरण्यात आलेले लिटर ( litter)चे साहित्य,कोंबडीचे खाद्य,जागा व पाण्याचा वापर यासारख्या घटकांवर अवलंबून असते.
कोंबडी खत तयार करण्याची पद्धत :
कोंबडी चे लिटर शेड असते जेव्हा ते बाहेर काढले जाते तेव्हा त्या लिटरचे २-३ ढिगा करावेत. त्यामध्ये कंपोस्ट जिवाणू मिसळावे. त्यामध्ये पाणी शिंपडावे.खताच्या ढिगाची एक महिन्याच्या अंतराने २ ते ३ वेळा नियमित चाळणी करावी. चांगल्या गुणवत्तेचे कोंबडी खत तयार होण्यास पाच महिन्यांचा कालावधी लागतो.
कोंबडी खताचे गुणधर्म
• खताचा रंग काळपट असावा.
•त्या मध्ये जलधारणशक्ती 30 टक्क्यांपेक्षा जास्त असावी.
•खताचा वास मातकट असावा.
•खताचा सामू ६.५- ७.५ दरम्यान असावा.
•कणांचा आकार ५ ते १० मिमी असावा.
•कर्ब नत्र गुणोत्तर १:१० ते १:२० दरम्यान असावे.
कोंबडी खत वापरण्याची पद्धती
• मातीच्या माणसा कधी पूर्वी कोंबडी खत एक महिना अगोदर मातीत मिसळावे व मग मातीची मशागत करावी.
व मग मातीची मशागत करावी. यामुळे कोंबडी खत माती मध्ये संपूर्ण पद्धतीने मिसळून जाते व पिकाला फायदा होतो.
• या गोष्टींची दक्षता घ्यावी कि ताजे कोंबडी खत उभ्या पिकात, जमिनीत मिसळू नये. जर उद्या पिकात द्यायचे असेल तर एक महिना अगोदर पाणी शिंपडून ते थंड होऊ द्यावे.म्हणजे त्याचे( Carbon)कर्ब नत्र गुणोत्तर स्थिर राहते.त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
• जमीन व पीक लागवडी नुसार प्रति एकरी 5 ते 20 टन खताचा वापर करावा. खता चा जास्तही वापर करू नये.
ऋतुजा ल. निकम ( MBA AGRI)
Published on: 05 March 2022, 02:05 IST