Agripedia

सेंद्रिय पद्धतीने बुरशी नाशक बनविता येते व ते पिकावर स्प्रे केल्यावर बुरशीचा प्रादुर्भाव पूर्ण नष्ट होतो.

Updated on 29 September, 2022 4:21 PM IST

सेंद्रिय पद्धतीने बुरशी नाशक बनविता येते व ते पिकावर स्प्रे केल्यावर बुरशीचा प्रादुर्भाव पूर्ण नष्ट होतो.आपला पिकावर बुरशी किंवा काही रस शोषक किडीचा प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे पिकाचे नुकसान होते.कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कायम आणि प्रत्येक स्टेजला दिसत असतो त्यासाठी आपण खालील घटक वापरू शकतो.

Trichoderma Viride Psodumonas Bacillus Bacteriaयांचा एकत्रित

गाईचे गौमुत्र आहे उत्तम वाढवर्धक व बुरशीनाशक, वाचाल तर मोठा खर्च वाचेल

ताकापासुन बुरशी नाशक बनविणे साहित्य : दशी गाईचे ताजे ताक साधारण सहा लिटर एक मातीचे मडके किंवा स्टीलचे भांडे.तांब्याच्या तारीचे तुकडे किंवा तांब्याचे पात्र / भांडी

कृती :देशी गाईचे ताजे बनलेले ताक साधारण सहा लिटर घेणे. हे ताक एका मडक्यात किंवा स्टीलच्या किंवा प्लास्टिक भांड्यात टाकावे. हे ताक टाकल्यावर त्यात तांब्याची कोणतीही वस्तू टाकावी. त्यात तारीचे तुकडे, भांडी ई. पैकी काहीही टाकावे. त्यात 100 ग्राम हळद टाकावी.हे सर्व द्रावण एकत्र करून हे मडके एखाद्या झाडाखाली जिथे सावली असेल तिथे जमिनीतील पूर्ण ठेवावे फक्त तोंड जमिनीच्या वर ठेवून ते

प्लास्टिक बांधुन बंद करून ठेवावे. किंवा उकिरड्यात पुरून ठेवावे.प्माण : हे द्रावण साधारण सहा ते तीस दिवस ठेऊ शकता. त्यानंतर हे द्रावण फवारणी साठी योग्य होते. एका 15 लिटर पंपासाठी 250 ते 500 Ml घेऊन फवारणी करू शकता. प्रमाण हे पिकानुसार व पिकाच्या अवस्थेनुसार बदलत जाते.फायदे / उपयोग : याच्या वापराने पिकावर असणारी बुरशी, किटक व आळी मरते.पिकाच्या कोणत्याही अवस्थेत याला फवारणी करू शकतो.

English Summary: Make fungicide and insecticide from buttermilk this way and see the difference
Published on: 29 September 2022, 02:01 IST