Agripedia

सुरवातीपासूनच आपल्यातील शेतकरी शेतीला तोट्याची शेती म्हणून ओळखत आहे. कारण पारंपरिक पद्धतीने केलेली शेती मधून जास्त उत्पादन मिळत नाही. तसेच नवनवीन यंत्र सामग्री चा वापर होत नसल्यामुळे शेतकरी शेतीला घाटयाचा धंदा सुदधा म्हणतो.

Updated on 29 June, 2021 2:13 PM IST

सुरवातीपासूनच आपल्यातील शेतकरी शेतीला तोट्याची शेती म्हणून ओळखत आहे. कारण पारंपरिक पद्धतीने केलेली शेती मधून जास्त उत्पादन मिळत नाही. तसेच नवनवीन यंत्र सामग्री चा वापर होत नसल्यामुळे शेतकरी शेतीला घाटयाचा धंदा सुदधा म्हणतो.

शेती लागवडी मध्ये आजकाल अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नवीन तंत्रज्ञान वापर करून कमी खर्चात आणि कमी पैशात आपण काकडीची लागण करून शकतो. आणि त्यापासून व्यवसाय कसा होतो हे सुद्धा  आपल्याला माहिती पाहिजे. नेदरलँड  जातीच्या काकडीला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते कारण या काकडी मध्ये बी अजिबातच नसतात त्यामुळं अनेक मोठ्या हॉटेल मध्ये या काकडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.नेदरलँड जातीच्या काकडीची किंमत ही सामान्य काकडीच्या दुप्पट असते. जर का देशी काकडी 30 रुपये किलो असेल तर नेदरलँड जातीच्या काकडीला 60 रुपये एवढा भाव बाजारात मिळतो.

काकडी पिकाची लागवड:-
काकडी हे एक उन्हाळ्याच्या हंगामातील पीक आहे. या पिकाला काढणीपर्यंत 60 ते 80 दिवस एवढा कालावधी लागतो. तसेच पावसाळ्याच्या ऋतूमध्ये काकडीचे पीक हे चांगले येत असते.

हेही वाचा:छोट्या बाटलीमधील डि-कंपोजर शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर; जाणून घ्या कृती आणि फायदे

काकडीची लागवड ही साधारणपणे फेब्रुवारीच्या आठवड्यात करावी. काकडी ची लागवड ही सर्व प्रकारच्या मातीमध्ये केली जाते. परंतु जर का काकडीचे उत्पन्न भरघोस हवे असेल तर जमीन ही काळी,वालुकामय,चिकन माती किंवा पाण्याचा निचरा व्हावा अश्या जमिनीत काकडीचे पीक हे उत्तम येते. या मातीचा पी एच हा 5.5 ते 6.7 च्या मध्ये असणे आवश्यक आहे.उत्तर प्रदेश राज्यातील अनेक शेतकरी वर्गाचे असे म्हणणे आहे की उच्च उत्पादनासाठी आणि भरघोस नफ्यासाठी नेदरलँड जातीची काकडी आपल्या रानात लावावी. या जातीच्या काकडी मधून 4 महिन्यांच्या काळात कमी कमी 8 लाख रुपये एवढी रक्कम मिळू शकते.

सरकारी मदत:-

जर का तुम्हाला काकडी लागवड सुरू करण्यासाठी सरकारी बागायती विभागाकडून अनुदान सुद्धा घेऊ शकतो.या काकडीला प्रचंड प्रमाणात मागणी असल्यामुळे या काकडीचे मार्केटिंग सुद्धा सोशल मीडियावर होते तसेच अनेक बड्या कंपन्या कोशिंबिर बनवण्यासाठी या काकडीचा उपयोग करता.

English Summary: Make cucumbers of this species in your forest and earn lakhs of rupees a month, the government will also help
Published on: 29 June 2021, 02:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)