Agripedia

भारत हा कृषीप्रधान देश आहे, देशात पन्नास टक्क्यांहून अधिक लोक शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत. शेतीला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून संबोधले जाते. शेतीतून जास्तीचे उत्पन्न प्राप्त करण्यासाठी गेल्या अनेक दशकापासून रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरू आहे. देशात सर्वात जास्त रासायनिक खतांचा वापर महाराष्ट्र राज्यात केला जातो. उत्पादनवाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर सुरू केला. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या या प्रयोगामुळे उत्पादन वाढीत मदत देखील मिळाली. गेल्या अनेक दशकांपासून सतत सुरू असलेल्या रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढ झाली, मात्र जमीन नापीक बनली. यामुळे सुरुवातीला उत्पादन वाढ झाली आणि आता उत्पादनच मिळत नाही. त्यामुळे देशात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शासन दरबारी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत.

Updated on 06 February, 2022 2:47 PM IST

अनेक प्रगत शेतकरी सेंद्रिय शेतीचे महत्व ओळखून सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. असे असले तरी देशात अजूनही अनेक शेतकरी रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर करत आहेत. रासायनिक खताच्या अति वापरामुळे जमिनीचा पोत खालावतो शिवाय यामुळे तयार होणारे उत्पादन विषारी बनते आणि याचा मानवी आरोग्यावर खूप घातक परिणाम होतो. यासाठी अनेक शोध करण्यात आले, या शोधात रासायनिक खता पासून तयार होणाऱ्या शेतमालाच्या सेवनाने अनेक लोक कर्करोगासारख्या भयंकर आजाराच्या आधीन गेल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे मानवी आरोग्यासाठी तसेच काळी आईची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज बनली आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन दरबारी अनेक उपक्रम राबवीले जात आहेत. देशातील सुजाण शेतकरी सेंद्रिय शेतीला महत्त्व देत आहेत. रासायनिक खतांच्या वापरामुळे होणारे नुकसान जाणुन अनेक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती सुरू केली आणि त्यातून दर्जेदार उत्पादन देखील प्राप्त करायला सुरुवात केली आहे.

सेंद्रिय शेतीत सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो जैविक खतांचा. वनस्पतींच्या तसेच प्राण्यांच्या अवशेषांपासून निर्मित खतांना जैविक खत म्हणून ओळखले जाते. यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते कंपोस्ट खत. कंपोस्ट खत वनस्पतीच्या अवशेषांपासून तयार केले जाते. आज आपण कांद्याच्या सालीपासून देखील कंपोस्ट खत तयार केले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत. कांद्याच्या सालीपासून कंपोस्ट खत तयार करता येत असल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा दुहेरी फायदा होणार असल्याचे सांगितले जातं आहे.

कांद्याच्या सालीपासून बनवा कंपोस्ट खत- शेतकरी मित्रांनो वनस्पतीच्या अवशेषपासून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते. याच पद्धतीने कांद्याची साल उपयोगात आणून पोटॅशियम युक्त कंपोस्ट खत यांची देखील निर्मिती केली जाऊ शकते. या खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल तसेच ज्या जमिनीत किंवा पिकात पोटॅशचे प्रमाण कमी आहे त्या जमिनीच तसेच पिकासाठी या पद्धतीचे कंपोस्ट खत वापरल्याने पोट्याशची मात्रा संतुलित करता येऊ शकते. 

कांद्याच्या सालीतुन निर्माण करण्यात आलेल्या खतापासून पिकांची वाढ जलद गतीने होते. हे खत तयार करण्यासाठी कांद्याची साले फेकून न देता अथवा जाळून न टाकता ते एका खड्ड्यात कंपोस्ट बनण्यासाठी टाकून द्या आणि यात वेळोवेळी पाणी टाकत राहा. यामुळे कांद्याच्या सालीपासून कंपोस्ट खत तयार होते. अशा कंपोस्ट खताचा वापर पिकाच्या वाढीसाठी उपयोगी ठरतो.

English Summary: make compost from onion peel
Published on: 06 February 2022, 02:47 IST