Agripedia

ब्लू काॅपर हे जगात सर्वप्रथम वापरलं गेलेलं बुरशीनाशक म्हणजेच Fungicide आहे. सर्व प्रकारच्या बुरशींसाठी बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक ब्लू काॅपर हा उपाय तर आहेच , पण हेच ब्लू काॅपर जैविक पद्धतीने तयार करता आले तर.

Updated on 20 December, 2021 1:31 PM IST

देशी गाईचे दूध एक वाटी घेऊन त्यामध्ये नेहमीपेक्षा तिप्पट विरजण टाकून त्याचे दही बनवावे.

देशी गाईचे दूध ताजे घ्यावे , पाश्चराईज्ड नको.

 दही जितके आंबट होईल तितके चांगले .. त्यामुळे फ्रिजमध्ये ठेवायचे नाही.  दुसऱ्या दिवशी सकाळी दही तयार झाल्यानंतर जेवढे दही तेवढेच पाणी घालून घुसळून घ्यावे.ताक करावे.

 हे तयार केलेले ताक एखाद्या जुन्या तांब्याच्या पात्रात ठेवून त्यावर झाकण ठेवा.तांब्याचा तांब्या (लोटा) ,प्लेट , भांडे .. कोणतेही तत्सम पात्र चालेल.

 रोज सकाळी, संध्याकाळी ते काडीने ढवळायचे आहे. सहा , सात दिवसांनंतर त्याचा रंग बदलून आकाशी निळा रंग येईल.

आता हे तयार झाले 100% जैविक ब्लू काॅपर.. झाडांसाठी सर्वोत्कृष्ट असलेले कामयाब असे बुरशीनाशक .तांब्याच्या पात्राला पर्याय म्हणून तांब्याची तार किंवा पत्रा वापरु शकता.एक वाटी दह्यासाठी साधारण 100 ग्रॅम तार लागेल.

या तारेचे पक्के वेटोळे करून ती गॅसवर निळ्या पिवळ्या रंगाच्या ज्वाला येईपर्यंत जाळायची.हलकेच आपटून किंवा ठोकून पुन्हा गरम करायची.शक्य तितका गोळा करायचा आणि लगेच थंड पाण्यात टाकायचा.त्यामुळे ती तार कडक होऊन जाईल तसंच त्यातील इन्सूलेशन ( रोधक ) निघून जाईल .

        प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये ताक घेऊन नंतर ही तार त्या ताकात टाकायची.आणि ऊबदार जागी ठेवायचे.रोजच्या रोज ढवळणे आवश्यक.

 उपयोग 

1) झाडावर , पिकांवर येणारी सगळ्या प्रकारची बुरशी नष्ट होते.

2) हे बुरशीनाशक आपण झाडांच्या मुळाशी , मातीत टाकू शकतो तसंच झाडांवर फवारणीही करू शकतो.

3) मातीतील जिवाणूंना कोणताही अपाय होत नाही..उलट जिवाणूंची संख्या वाढते.

4) माती जिवंत राहते.

5) या बुरशीनाशकाचा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर केला तर जमिनीच्या देखभालीचा खर्च वाचतो.

 प्रमाण :

 एक लिटर पाण्यात 25 मिली फवारणी करीता , आणि माती मधुन कुडितिल झाडांना आणी 

50 मिली मोठ्या झाडांना अशा प्रमाणात घ्यावे.

वापरण्याचा कालावधी

ब्लू काॅपर तयार केल्यानंतर शक्यतो एकाच वेळी वापरून संपवावे.त्यातूनही उरले तरी हरकत नाही. पुन्हा त्याच तांब्याच्या पात्रात ठेवावे .

अथवा तार गरम करून त्यात टाकावी.पुढील पंधरा दिवसांनी पुन्हा वापरता येते.

पावसाळ्यात आठवड्यातून एकदा , हिवाळ्यात पंधरा दिवसांतून एकदा आणि उन्हाळ्यात महिन्यातून एकदा जैविक ब्लू काॅपरचा वापर करावा.

या कृतीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट - ज्या पात्रामध्ये हे बुरशीनाशक करायला ठेवले असेल ते कमीत कमी महिनाभर इतर कोणत्याही कामाला वापरु नये.सावधगिरी बाळगावी.

वरील माहितीचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

https://youtu.be/o5qzXAmYmoM

                 

                 मिलिंद काळे

                            M.Sc. agri.

                      9158172674

English Summary: Make Bio blue copper
Published on: 20 December 2021, 01:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)