Agripedia

शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनासाठी कितीही काळजी घेतली तरी त्यांच्या नशिबी उत्पादनात घट मात्र ठरलेलीच आहे. कापसावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यातील कापूस हे पीक गायब होत असताना दिसत आहे.

Updated on 27 July, 2022 10:22 AM IST

शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनासाठी (Cotton production) कितीही काळजी घेतली तरी त्यांच्या नशिबी उत्पादनात घट मात्र ठरलेलीच आहे. कापसावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यातील कापूस हे पीक गायब होत असताना दिसत आहे.

बोंडअळीमुळे फक्त कापसालाच नाही तर इतर पिकांना आणि शेतजमिनीला धोका पोहचत आहे. या कारणाने कापसाच्या क्षेत्रात घट होऊन सबंध राज्यात (Soybean Area) सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. यावर्षी कापसाच्या उत्पादनात देखील वाढ होईल असे चित्र निर्माण झाले आहे.

कारण केंद्र सरकारने किड व्यवस्थापन (Kid management) या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यासह यंदाच्या हंगामापासूनच याची अंमलबजावणी देखील होणार आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार आणि किडीचा प्रादुर्भाव (Insect infestation) कमी होणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा 
Rice farming: भारीच की; शेतकऱ्यांना भात लागवड यंत्रावर मिळतंय 50 टक्के अनुदान; करा आजच अर्ज

केंद्रीय कापूस संस्थेचा उपक्रम

दरवर्षी बोंडअळीमुळे कापसाच्या उत्पादनात तब्बल 50 टक्के घट ही ठरलेली असते. त्यामुळेच सध्या देशात कापसाचा तुटवडा निर्माण होत आहे. कापसावरच नाहीतर बोंडअळीमुळे इतर पिकांच्या उत्पादनावरही परिणाम झालेला आहे.

यामुळे प्रक्रिया उद्योजकांना चांगल्या दराने कापसाची खरेदी करुन उद्योग सुरु ठेवावे लागत आहेत. यंदा मात्र, केंद्रीय कापूस संस्थेने घेतलेला उपक्रम जर यशस्वी झाला तर कापूस पिकाबाबत चित्र पूर्णपणे बदललेले असेल.

हे ही वाचा 
२१०० किलो मटन, तेवढेच चिकण, १२०० किलोचे मासे, १३ हजार अंडी, भाजप आमदाराची आखाड पार्टी जोरात..

कापसाचे उत्पादन वाढणार

बोंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात येण्यासाठी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या माध्यमातून आयआरएम (IRM) अर्थात इनसेक्ट रजीस्टंन्स मॅनेजमेंट हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यामुळे 30 टक्के बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यात संस्थेला यश आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे या प्रकल्पाला यंदाच्या हंगामापासूनच मान्यता देण्यात आली आहे. चंद्रपूर, वर्धा, अमरावती, नागपूर, यवतमाळ, नांदेड, परभणी, जालना, अकोला या जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पांची अंमलजावणी होणार आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या 
Heavy Rain: सावधान! 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; पुढील काही दिवस धोक्याचे
President Draupadi Murmu: कांद्याच्या दरासाठी थेट राष्ट्रपतींकडे साकडे, देणार 1 टन कांदा भेट
Animal Husbandry: सावधान! जनावरांमध्ये वेगाने पसरतोय लम्पी स्किन डिसीज, अशी घ्या काळजी

English Summary: Major decision Cotton Research Institute increase cotton production
Published on: 27 July 2022, 10:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)