मकाचे अधिक उत्पादन मिळण्या करीता सर्वांना शुभेच्छा.
खरीप हंगामातील पिकाची काढणी झाल्यानंतर जमीनीची पूर्वमशागत करावी. त्यात वखरटीच्या उभ्या - आडव्या पाळ्या देऊन घ्या. चांगले कुजलेले शेणखत उपलब्ध असल्यास पसरवून नंतर ऱोटावेटर ने जमिन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. शेणखत कमी उपलब्ध असल्यास गादीवाफे तयार करतांना जमिनीत मिसळून टाकावे.
गादीवाफे तयार करतांना एकरी १०:२६:२६ - दोन गोण्या ( १०० किलो ) + मँग्नेशियम सल्फेट - १५ किलो + गंधक - १० किलो + झिंक सल्फेट - ५ किलो + फेरस सल्फेट - ५ किलो + मँग्नीज सल्फेट - २ किलो + बोरँक्स - ३ किलो. वरील सर्व खते निंबोळी पेंड - २५० किलो मध्ये चांगली मिसळून गादीवाफ्यावर टाकून जमिनीत चांगली मिसळावीत.
गादी वाफ्याची रूंदी २फूट असावी, उंची १फूट असावी.
गादीवाफे उत्तर - दक्षिण बनवावेत.
ठिबक सिंचन संचाची उभारणी करून घ्यावी.
जमिन भारी असल्यास दोन इनलाईन नळ्यांतील अंतर ५ फूट ठेवावे. जमिन मध्यम असल्यास दोन इनलाईन नळ्यांतील अंतर ४ किंवा ४.५ फूट अंतर ठेवावे.
ज्यांना कृषी विभाग कडून ठिबक वर अनुदान घ्यावयाचे आहे त्यांनी जैन टर्बो एक्सेल किंवा जैन टर्बोलाईन सुपर इनलाईन नळी घ्यावी. ज्यांना कृषीविभागाचे अनुदान घ्यावयाचे नसेल त्यांनी कमी खर्चाची इनलाईन नळी जैन टर्बो स्लिम किंवा जैन पॉलीस्लिम इनलाईन नळी ची निवड करू शकता.
ठिबक मधून पाण्यात विरघळणारी खते देण्यासाठी जैन व्हेंचूरी किंवा फर्टीलायझर टैंक बसवून घ्यावी.
मका पिकाचे एकरी विक्रमी उत्पादन घेण्याकरीता मका पिकाची ठिबक वर लागवड करावी व विद्राव्य खतांचा वापर करावा.
जाती -
पायोनिअर - ३५२४, ३३९६, ३५०१, ३३०२
अँडव्हांटा - ७५७,७५१,७५९, ७४१
सिंजेंटा - ७७२०,६२४०,६६६८
बायर - ९१५०, पिनँकल
इको ९१, गोदरेज १०५,राखी, ड्रैगन.
वरील पैकी कोणतीही अधिक उत्पादन देणारी रब्बी हंगामासाठीची जातीची निवड करावी.
लागवड टोकण पद्धतीने करावी.
लागवड उत्तर - दक्षिण करावी.
लागवडीचे अंतर –
गादीवाफ्यावर मध्यभागी दोन ओळी टोकण पद्धतीने लागवड करावी. जमीन भारी असल्यास दोन ओळींमध्ये अंतर ४० सेमी ठेवावे, जमिन मध्यम असल्यास दोन ओळींमध्ये अंतर ३० सेमी ठेवावे. दोन बियांमध्ये अंतर २० सेमी ठेवावे.
गादीवाफ्याच्या मध्यभागी ठिबकची इनलाईन नळी सरळ ठेवून नळी शेवटी खुंटीला बांधावी.
लागवड करण्यापूर्वी गादीवाफा वाफसा अवस्थेत आणून घ्यावा इतकाच वेळ ठिबक सिंचन संच चालवून घ्यावा.
गादीवाफ्यावर बावीस्टीन - १०० ग्रैम १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी अथवा ड्रेंचींग करावे. किंवा जिवामृत मध्ये ट्रायकोडर्मा मिसळून ड्रेंचींग करावे.
गादीवाफा वाफसा अवस्थेत आल्यानंतर वर सुचविलेल्या अंतरावर टोकण पद्धतीने लागवड करावी. बियाण्यास लष्करी अळी करीता प्रक्रिया केलेली असावी किंवा लागवडी वेळी एकरी ५ किलो थायमेट चा वापर करावा.
मक्याच्या एकरी झाडांची संख्या-
ठिबक नळी ४ फुट - ३३७२५
ठिबक नळी ४.५' - २९९७७
ठिबक नळी ५ फूट- २६९८०
एका ठिकाणी एकच बी लावून मातीने नीट झाकावे.
जमिन वाफसा अवस्थेत राहील एवढयाच वेळ ठिबकने पाणी द्यावे. जास्त पाणी देऊ नये.
अशा पद्धतीने मका पिकाची लागवड करावी. लागवडी नंतर १० दिवसांनी ठिबक मधून खते देण्यास सुरूवात करावी.
पुढील आठवडयात फर्टीगेशन म्हणजेच ठिबक मधून पाण्यात विरघळणारी खते का, केव्हा आणि कशी द्यावी ते समजून घेऊ. मका साठी फर्टीगेशन चे शेड्यूल वरही चर्चा करू.
ह्या आठवड्यात मका पिकाची लागवड पूर्ण होतील असे वाटते. चला तर मग कामाला लागू या. यश आपले वाट पाहत आहे.
मका पिकाचे सर्व शेतकरी बंधूंना विक्रमी उत्पादन मिळण्या करीता शुभेच्छा....
- डॉ.बी डी जडे,
वरिष्ठ कृषीविद्या शास्त्रज्ञ,
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
Published on: 18 November 2021, 09:02 IST