Agripedia

आले पिकाचा विचार केला तर हे पीक मराठवाडा पासून तर खानदेश पर्यंत बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे आल्या मधील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवनातील मसाल्यात आल्याचे महत्त्वाचे स्थान आहे.

Updated on 07 November, 2021 1:50 PM IST

आले पिकाचा विचार केला तर हे पीक मराठवाडा पासून तर खानदेश पर्यंत बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जात आहे आल्या मधील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवनातील मसाल्यात आल्याचे महत्त्वाचे स्थान आहे.

ओलिताची सोय असल्यास  एप्रिल आणि मे महिन्यामध्ये याची लागवड करता येते.या लेखात आपण आले पिकावर येणाऱ्या महत्वाचे रोग व त्यांचे नियंत्रण याबद्दल माहिती घेणार आहोत.

आले पिकावरील रोग व त्यांचे नियंत्रण

  • कंदकूज-
    • हा रोग प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अधिक प्रमाणात दिसतो.
    • यामध्ये प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात.
    • खोडाचा जमिनीलगतचा भाग काळपट राखी पडतो. याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गड्डाहीवरून काळा पडलेला व निस्तेज झालेला दिसतो.
    • हा रोग प्रामुख्याने सूत्रकृमी किंवा खुरपणी, आंतर मशागत करताना कंदास इजा झाल्यास त्यातून पीथीएम,फुजेरीयमयासारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये प्रादुर्भाव होऊन कंद कुजण्यास सुरुवात होते.

या रोगाचे नियंत्रण

  • लागवडकरतना निरोगी बियाण्याचा वापर करावा.
  • हलकी ते मध्यम परंतु उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.
  • पावसाळ्यात शेतामध्ये चर घेऊन पाण्याचा निचरा करावा.
  • मेट्यालेक्सिल(8टक्के)+ मॅन्कोझेब (64 टक्के ) हे संयुक्त बुरशीनाशक अडीच ग्रॅम प्रति लिटर किंवा कार्बेन्डाझिम(50 डब्ल्यू पी ) एक ग्रॅम किंवा मॅन्कोझेब अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बीजप्रक्रिया करावी.
  • शेती मध्ये हा रोग आढळून आल्यास याच बुरशीनाशकाची आलटून-पालटून फवारणी करावी.
  • नरमकूज-

1-जमिनीत पाण्याचा निचरा बरोबर न झाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

2-

शेंड्याकडून झाड वाळत जाते.

3- बुंध्याचा भाग सडल्यामुळे सहज उपटला जातो.

4- त्यानंतर जमिनीतील गड्डे सडण्यास सुरुवात होते.

या रोगाचे नियंत्रण

  • रोगट झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
  • लागवडीपूर्वी व नंतर दर महिन्याला पिकावर बोर्डो मिश्रण फवारावे.
  • प्रत्येक वर्षी एकाच जमिनीत आले पिकाची लागवड न करता पिकाची फेरपालट करावी.
  • पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत आले पिकाची लागवड करावी.
English Summary: main effective disease on ginger crop and remedies of control
Published on: 07 November 2021, 01:50 IST