Agripedia

आले हे पीक साताऱ्यापासून ते मराठवाडा पर्यंत मोठ्या प्रमाणात केली जाते. आल्याला असलेली विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जीवनातील मसाल्यामध्ये आल्याचे महत्त्वाचे स्थान आहे. या लेखात आपण आल्या वरील प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण याबद्दल माहिती घेणार आहोत.

Updated on 25 October, 2021 1:46 PM IST

 आले हे पीक साताऱ्यापासून ते मराठवाडा पर्यंत मोठ्या प्रमाणात केली जाते. आल्याला असलेली विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जीवनातील मसाल्यामध्ये आल्याचे महत्त्वाचे स्थान आहे. या लेखात आपण आल्या वरील प्रमुख रोग व त्यांचे नियंत्रण याबद्दल माहिती घेणार आहोत.

आले पिकातील प्रमुख रोग

अ)कंदकूज-

1- हा रोग प्रामुख्याने जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अधिक प्रमाणात दिसतो.

2- या रोगामध्ये प्रथम पानांचे शेंडे वरून व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात.

3- खोडाच्या जमिनी कडचा भाग काळपट राखी पडतो.याच ठिकाणी माती बाजूस करून पाहिल्यास गदा ही वरून काळा पडलेला व निस्तेज झालेले असतो.

4- हा रोग प्रामुख्याने सूत्रकृमी किंवा खुरपणी, आंतर मशागत करताना  कंदास इजा  झाल्यास त्यातून पीथिएम, फ्युजॅरियम सारख्या बुरशींचा गड्ड्यामध्ये प्रादुर्भाव होऊनकंद कुजण्यास सुरुवात होते.

नियंत्रण

  • आल्याची लागवड करताना निरोगी बियाण्याचा वापर करावा.
  • उत्तम पाण्याचा निचरा होणारी हलकी व मध्यम जमीन निवडावी.
  • पावसाळ्यात शेतामध्ये चर देऊन पाण्याचा निचरा करावा.
  • मेट्यालेंक्सिल(8 टक्के )+ मॅन्कोझेब(64 टक्के ) हे संयुक्त बुरशीनाशक अडीच ग्रॅम प्रति लिटर किंवा मॅन्कोझेब अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बीजप्रक्रिया करावी.
  • शेतामध्ये हा रोग आढळून आल्यास याच बुरशीनाशकाची आलटून-पालटून फवारणी करावी.
  • लागवड करताना प्रति एकरी दोन किलो ट्रायकोडर्मा शेणखतातून मिसळून द्यावे.

आ) पानावरील ठिपके/ करपा-

1- या रोगाची सुरुवात कोवळ्या पानावर होऊन नंतर तो सर्व पानावर पसरतो.

2- पानावर असंख्य लहान गोलाकार ठिपके तयार होतात.

नियंत्रण

  • 25 ते 30 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा दहा ते पंधरा ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा एक टक्का बोर्डो मिश्रण तयार करून फवारणी करावी.
  • ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात हवामानाची स्थिती पाहून 15 ते 20 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

इ) नरम कूज-

1- जमिनीत पाण्याचा निचरा बरोबर न झाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

  • शेंड्या कडून झाड वाळत जाते.
  • बुंध्याचा चा भाग सडल्यामुळे सहज उपटला जाऊ शकतो.
  • त्यानंतर जमिनीतील गड्डे सडण्यास  सुरुवात होते.

नियंत्रण

  • रोगट झाडे समूळ उपटून नष्ट करावीत.
  • लागवडीपूर्वी यानंतर दर महिन्याला पिकावर बोर्डो मिश्रण फवारावे.
  • प्रत्येक वर्षी एकाच जमिनीत आले पिकाची लागवड न करता पिकाची फेरपालट करावी.
  • पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत आले पिकाची लागवड करावी.
English Summary: main disease in ginger crop take precaution and amanagement
Published on: 25 October 2021, 01:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)