Agripedia

देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पारंपरिक पिकांची लागवड केली जाते. पारंपारिक पीक पद्धतीत उत्पादन खर्च हा अधिक असतो परंतु प्राप्त होणारे उत्पादन हे खुप नगण्य असते. त्यामुळे शेतकरी बांधवाना पिक पद्धतीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो. अनेक शेतकरी बांधव पिक पद्धतीत मोठा अमूलाग्र बदल घडवून आणत आहेत, मात्र अनेक शेतकरी बांधव अजूनही पारंपरिक पिकांची लागवड करीत आहेत. आज आपण महोगणी या झाडाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत. या झाडाची लागवड करून शेतकरी बांधव चांगला मोठा नफा अर्जित करू शकतात. या झाडाची लागवड लॉंग टर्ममध्ये चांगली फायद्याची सिद्ध होऊ शकते.

Updated on 23 February, 2022 3:02 PM IST

असं सांगितलं जातं की, महोगणीचे 120 झाड एक एकर क्षेत्रात जर लागवड केलेत तर बारा वर्षानंतर शेतकरी बांधव करोडपती बनु शकतात. महोगणी एक सदाहरित वृक्ष म्हणून ओळखले जाते, याची लागवड करून शेतकरी बांधव चांगला मोठा नफा कमवू शकतात. याचे झाड दोनशे फुटापर्यंत वाढण्यास सक्षम असते,या झाडाचे लाकूड लाल आणि भुऱ्या रंगाचे असतात. या झाडाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या झाडाला जास्तीच्या पावसाचा कुठलाच धोका नसतो. महोगणीचे झाड अशा प्रदेशात लावली जातात ज्या ठिकाणी वादळी वारे वाहत नाहीत, या झाडाला अतिरिक्त उंची असल्याने या झाडाची लागवड वादळी वारे वाहणाऱ्या प्रदेशात केले जाऊ शकत नाही. भारतात या झाडाची लागवड डोंगराळ प्रदेश वगळता सर्वच ठिकाणी केली जाऊ शकते. या झाडाची लागवड सुपीक जमिनीत तसेच सामान्य पीएच असलेल्या जमिनीत केल्याने अधिक उत्पादन प्राप्त होते. असे असेल तरी या झाडाची लागवड ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होतो अशा जमिनीत करण्याचा सल्ला दिला जात असतो.

महोगणीचे झाड अतिशय दुर्मिळ आणि या झाडाचे लाकूड अतिशय महाग असल्याचे सांगितले जाते. या झाडाला परिपक्व होण्यासाठी बारा वर्षांचा कालावधी लागत असल्याचे सांगितले जाते. या झाडाच्या लाकडाला जास्तीच्या पाण्याचा कुठलाच विपरीत परिणाम होत नाही त्यामुळे या झाडाचे लाकूड फर्निचर बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. फर्निचर मध्ये खुर्ची टेबल दरवाजे खिडक्या इत्यादी वस्तू बनवण्यासाठी या झाडाच्या लाकडाचा उपयोग होतो. एवढेच नाही तर या झाडाची पाने औषधी गुणधर्मांनी युक्त असतात, याची पाने कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारांत उपचारासाठी वापरले जातात. या झाडांच्या या औषधी गुणधर्मांमुळे देखील या झाडाला विशेष मागणी असते. या झाडांची लागवड केली असता आजूबाजूच्या परिसरात डास मच्छर वाढत नाहीत त्यामुळे या झाडांच्या पानाचा तसेच बियाचा वापर मच्छर पळवण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.

महोगनीच्या झाडापासून 12 वर्षात लाकूड तयार होते. म्हणजे हे झाड कापणीसाठी 12 वर्षात तयार होत असते आणि 5 वर्षातून एकदा या झाडाला बिया येतात. या झाडाचे बियाणे खूप महाग आहे आणि ते 1000 रुपये प्रति किलोने विकले जाते तर त्याचे लाकूड 2000 ते 2200 रुपये एवढ्या दराने विकले जातं असते. ही एक औषधी वनस्पती देखील आहे, म्हणून तिच्या बिया आणि फुले औषधी बनवण्यासाठी वापरली जातात. त्यामुळे याच्या लागवडीतून करोडोंचा नफा मिळू शकतो.

English Summary: mahogani farming is good for income learn more about it
Published on: 23 February 2022, 03:02 IST