Agripedia

मागेल त्याला शेततळे या शासकीय योजने विषयी सविस्तर माहिती सांगणार आहोत या मध्ये आम्ही लागणारी आवश्यक कागदपत्रे त्यांची पूर्तता या विषयी माहिती सांगणार आहोत.आजकल शेती करायची म्हटलं की सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे पाणी हे आहे. शेतकरी पाण्यावाचून शेती नाही करू शकत. आपल्या देशात अनेक अशी गावे राज्ये आहेत त्या ठिकाणी शेती फक्त पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते.

Updated on 15 June, 2021 8:55 AM IST

मागेल त्याला शेततळे(pond) या शासकीय योजने विषयी सविस्तर माहिती सांगणार  आहोत  या मध्ये आम्ही लागणारी आवश्यक कागदपत्रे  त्यांची पूर्तता  या  विषयी माहिती सांगणार आहोत. आजकल  शेती  करायची  म्हटलं  की सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे पाणी हे आहे. शेतकरी पाण्यावाचून शेती नाही करू शकत.आपल्या देशात अनेक अशी गावे राज्ये आहेत त्या ठिकाणी शेती फक्त पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते.

शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ:

दुर्गम भागात शेती करायची असेल तर पाण्याची खूप बोंब असते. कारण तेथील शेती फक्त पावसाच्या जीवावर किंवा एखाद्या विहिरीवर चाललेली असते. त्यामुळं शेतीला मुबलक पाणी मिळत नाही आणि  उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट होते.पाण्याचा विचार करता सरकारने शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे ही  योजना आणली आहे. यातून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि शेतकरी पीक यात वाढ व्हावी या साठी सरकारने ही योजना चालू केली आहे. कोकण भाग वगळता प्रत्येक गावातील लाभार्थी शेतकऱ्याला शेत तळे सरकारतर्फे दिले जाते.

हेही वाचा:मृग नक्षत्राच्या सुरवातीस करा ही 2 पिके, कमी कष्ट करून भरघोस फायदा झाल्याशिवाय राहणार नाही

जाणून घ्या योजनेच्या मुख्य अटी:-

  1. लाभार्थी शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी.
  2. शेतकऱ्यांची जमीन तळे बांधण्यासाठी अनुकूल असावी ज्याने करून पावसाच्या पाण्याने सुद्धा शेततळे भरता येईल.
  3. या पूर्वी शेतकऱ्यांने सामाजिक शेततळे किंवा भात खाचरातून तयार होणारी बोडी याचा उपयोग शासकीय योजनांतून घेतलेला नसावा.

अत्यावश्यक कागदपत्रे:-

1)जमिनीचा 7/12 खाते उतारा.
2)8 अ चा उतारा.
3)दारिद्र्य रेषेखालील कार्ड.

या मध्ये शेततळ्याचे अनुदान हे 50 हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना मिळते. हा अर्ज तालुक्यातील कृषी कार्यालयात जाऊन भरावा आणि मागेल ते शेततळे ही योजना घ्यावी.

English Summary: Magel Tyala Shettale Yojana for every farmer
Published on: 13 June 2021, 07:09 IST