भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 28 सप्टेंबर रोजी आयसीएआरने (The Indian Council Of Agriculture Research) विकसित केलेल्या पिकांच्या 35 विशेष जाती देशाला समर्पित केल्या. या जातींची लागवड करून आपले शेतकरी बांधव (Farmer) चांगले उत्पादन घेऊ शकतात शिवाय हवामान बदल आणि कुपोषणासारख्या (Malnutrition) गंभीर आव्हानांचा सामना करण्यास आपला भारत (India) देश सक्षम बनू शकतो. ज्या पिकांच्या जाती राष्ट्राला समर्पित केल्या त्या जातीमध्ये गव्हाच्या मालवीय 838 (Wheat Variety Malviya 838) या जातीचा पण समावेश आहे.
मालवीय 838 ही गव्हाची जात बनारस हिंदू विद्यापीठ (Banaras Hindu University), वाराणसीच्या कृषी विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. आणि ह्या जातीची विशेषता ही नमूद करण्यासारखी आहे, हो, कारण ही जात कमी पाणी असले तरी बम्पर उत्पादन देण्यास सक्षम आहे. म्हणजे ज्या भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे किंवा जिथे पिकपाणी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते अशा भागात ह्या गव्हाच्या वाणीचे उत्पादन घेतले जाऊ शकते. म्हणजे साहजिकच शेतकऱ्यांचा ह्या जातीपासून फायदा होणार आहे. आणि दुष्काळी भागातील शेतकरी आता आपला उदरनिर्वाह चांगल्या तऱ्हेने भागवू शकतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मालवीय 838 गव्हाच्या जातीची विशेषता
बीएचयूच्या (Banaras Hindu University) आनुवंशिकता आणि वनस्पती प्रजनन विभागाचे प्राध्यापक व्हीके मिश्रा यांनी सांगितले की ही गव्हाची विशेष जात तयार करण्यासाठी त्यांच्या टीमने अथत परिश्रम केले आणि तब्बल 6 वर्षे एकत्र काम करून ही गव्हाची नवीन वाण तयार झाली. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की मालवीय 838 ह्या जातीच्या गव्हात जस्त आणि लोह खुप चांगल्या प्रमाणात आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आणि ह्यामुळे कुपोषनासारख्या भयावय परिस्थितून बाहेर पाडण्यासाठी देखील ही जात आपले योगदान देईल. असं सांगितलं जात आहे की, या जातीच्या गव्हाची लागवड (Wheat Farming) केल्यास शेतकऱ्यांची नक्कीच उत्पादकता वाढेल. तसेच, इतर जातींच्या तुलनेत ह्या जातीला पाण्याचीही गरज कमी भासेल.
गव्हाची ही जात रोगापासून लढण्यास, बचाव करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ह्या जातीचे उत्पादन हे इतर जातींच्या तुलनेत खुप जास्त असेल असे अनेक विशेषज्ञ नमूद करत आहेत. म्हणजेच ह्या गव्हाच्या जातीची लागवड (Wheat Cultivation) ही शेतकऱ्यांसाठी सोने पे सुहागा अशी परिस्थिती आणून देणार आहे आणि हे आपल्या देशासाठी, देशाच्या अर्थव्यवस्थासाठी, देशाच्या बळीराजासाठी एक 'आनंदवार्ता' आहे.
Published on: 30 September 2021, 12:54 IST