सततच्या नापीकी मुळे सर्वच ठीकानचा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे,शेती मधे पाहीजे तेवढे यश आता शेतकर्याला येत नाही.त्यामुळे शेतकर्याचा उत्पादनावर खर्च जास्त होतो व प्रत्यक्षात उत्पन्न मात्र कमी.
कधीकाळी एखादेवेळी उत्पादन चांगले झालेही तर त्याला बाजारपेठेत भाव मीळत नाही.आता चीत्र असे दिसतंय की शेतकरी थकला या सर्व गोष्टीला..नेहमी सरकार कडुन काय मदत मीळेल,व मीळवता येईल याकडे जास्त लक्ष शेतकर्याचं असतं.त्याला कारनही तसंच आहे.सतत ची नापीकी व होनारा खर्च होउन जातो.आता हे असेच चालु ठेवायचे की याला कुठेतरी थांबवायचं.शेवटी परीवर्तनाशिवाय कुठेही मार्ग निघत नाही,व परीवर्तनाने कुठेही मार्ग निघतो. या सर्व परीस्थीतीचा शेतकरी गांभीर्याने कधी विचार करनार.कीत्येक शेतकर्यांना नापीकीमुळे जमीनी विकताना मी पाहीले.कीत्येक शेतकर्यांना र्जबाजारीपनामुळे आत्महत्या करतानी मी पाहीले.
खरंच शेती वीकने,गहान ठेवने कींवा आत्महत्त्या हा एकच मार्गशेतकर्याकडे आहे का.शेतकर्याने सरकारच्या भीकेची वाट पाहने हा एकच मार्ग शेतकर्याकडे आहे का. मुळात ह्या सर्व गोष्टी कशामुळे घडल्यात,पान्याची पातळी कशामुळे कमी झाली,पाउस सुध्दा पाहीजे तसा येत नाही.
ह्या सर्व गोष्टीला कोण जबाबादार आहे कधी आपण विचार केला का.?रासायनीक खते व कीडनाशकाचा भरमसाठ वापर व त्यापासुन होनारे मोठ्ठे नुकसान यावर कधीच आपण विचार केला नाही व तशी गरजही वाटली नसावी. या सर्व गोष्टीसाठी ह्याला,त्याला दोष देउन आपण मोकळं होउन जायचं व पुन्हा आपलं जे आहे ते सुरुच ठेवायचं.
असंच ना.हीच आहे ना वास्तवीकता.पण आवर्जुन एक सांगतो,आता वेळ आलीय ही सर्व सीस्टीम बदलायची,रासायनीक शेती पासुन दुर जान्याची,विषमुक्त शेती करन्याची.
जर सर्वांना सुखी व्हायचं असेल,सर्व गोष्टी पुर्ववत करायच्या असेल तर त्या साठी एकच उपाय...
विषमुक्त शेती.
कोनत्याही राजकारन्याच्या मागे न लागता आपला मार्ग आपणच शोधा.आपला मार्ग नीश्चीतच विषमुक्त शेतीतच सापडेल हे गँरंटीने सांगतो.विषमुक्त शेती पीकत नाही.रासायनीक शिवाय जमतच नाही.विषारी कीडनाशकाशीवाय कीडी जातच नाही.हे सर्व डोक्यातुन काढुन टाका.
प्रत्येक जील्ह्यात आज विषमुक्त शेती करनारा शेतकरी आहे,त्यामुळे त्या शेतकर्याच्या संपर्कात येउन आपणही थोड्या क्षेत्रावर विषमुक्त शेतीला सुरवात करा.व आपन पीकवलेला विषमुक्त शेतमाल आपणच विका.व दोन पैसे जास्त मीळवा.
विषमुक्त शेतीचे कोनतेही तंत्र वापरुन समृध्द होन्याचा मार्ग निवडा.
विषमुक्त कमी खर्चाची,गाईच्या शेण गोमुत्रावर आधारीत शेती केल्यास आपण नक्कीच सुखी व्हाल,आपल्या दारात सुख नांदेल,आपली आर्थीक परीस्थीती बदलन्यास मदत होईल एवढे मात्र नक्की.
राहुल साहेबराव उभाड
Rahul4patil1212@gmail.com
Published on: 07 January 2022, 10:53 IST