Agripedia

थारपारकर गाय राजस्थानच्या जोधपुर आणि जैसलमेर या ठिकाणी मुख्यतः पाळली जाते.

Updated on 27 January, 2022 5:18 PM IST

थारपारकर गाय राजस्थानच्या जोधपुर आणि जैसलमेर या ठिकाणी मुख्यतः पाळली जाते. गुजरात राज्याच्या कच्छ भागात देखील या गायींची संख्या जास्त आहे. या गायीचे उत्पत्ती स्थळ हे मालानी( बाडमेर)आहे. ही गाय जास्त दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

 राजस्थानमध्ये या गाईला स्थानिक भाषेत मालानी असे संबोधतात. या दिवशी काही आध्यात्मिक घटना जोडले गेले आहेत जसे की, भगवान श्रीकृष्ण जवळ हीच गाय होती तसेच आता ती पश्चिम राजस्थान मध्ये कामधेनु या रूपाने मान्य आहे.

थारपारकर गाईचे मूळस्थान

 देशी जातींच्या गाईमध्ये थारपारकर ही जात सर्वश्रेष्ठ मानली जाते. ही जात मूळची कराची च्या जवळ थारपारकर जिल्ह्यामधील आहे. पाकिस्तान सीमा असल्याकारणाने पश्चिमी राजस्थान मध्ये या जातीच्या गाईचा प्रभाव अधिक आहे. ही गाय लांबूनच ओळखता येते. कारण पूर्ण सफेद रंग, पूर्ण विकसित, कानाच्या बाजूला आत वळलेली शिंगे, शरीर आणि सामान्य असलेली ही गाय साडेतीन ते चार फूट उंच असते. या गाईचे शारीरिक आरोग्यही उत्तम असते सोबतच कमी खर्चात सर्वाधिक दूध देते.

 थारपारकर गाईची अन्य वैशिष्ट्ये

 या गाईची रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे. तिचे शारीरिक स्वास्थ्य चांगले असून कमी खर्चात जास्त दूध देते. 

थारपारकर गायीचा विकासा कांकरेज, सिंधी आणि नागोरी जातीच्या गाई पासून केला गेला आहे. या जातीच्या गाई ला दुहेरी उद्देश असलेली गाय मानली जाते. या जातीच्या बैल हे जास्त मेहनती असतात. दुष्काळी भागात ही गाय चांगला टिकाव धरू शकते. छोटे छोटे झाडेझुडपे अशा जंगल वनस्पतींवर गुजराण करू शकते.

 हे गाय चांगल्या प्रकारचे दूध उत्पादक गाय मानले जाते. या जातीची गाय प्रति दिन दहा लिटर पर्यंत दूध देते भारताच्या स्वातंत्र्यानंतर या जातीच्या गाई च्या संरक्षण व संवर्धनासाठी आवश्यकता भासली. यासाठी हवा, जमिनीची उपलब्धता, यायला लागणारा चारा आणि पाणी इत्यादीच्या उपलब्धतेनुसार जैसलमर जिल्ह्याच्या चांधन मध्ये एक केंद्र स्थापन केले. 

सुरुवातीच्या काळात याचे नाव बुल मदर फार्म असे होते. थारपारकर जातीच्या गोवंशाची मागणी पूर्ण देशात आहे. नागालँड, मनिपुर, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम सारख्या काही राज्यांना सोडून बाकीच्या पूर्ण भारतात या गाईला श्रेष्ठ देशी गाय म्हणून स्वीकारण्यात आले आहे. भारताच्या पशुपालन आणि डेरी संस्थांमध्ये या गायींची मागणी फारच प्रमाणात आहे.

English Summary: Low cost more milk cow tharparkar
Published on: 27 January 2022, 05:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)