Agripedia

विकास प्रकल्पांसाठी एकीकडे मोठय़ा प्रमाणात शेतजमीन अधिग्रहीत केली जात असतानाच दुसरीकडे जमिनीची धूप होत असल्याने दरवर्षी लागवडीखालील शेतजमिनीची हेक्टरी १० टनाहून अधिक हानी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Updated on 05 May, 2022 7:45 PM IST

याबाबत देशभरातील वेगवेगळय़ा एजन्सी व संस्था त्यांनी निर्धारित केलेल्या निकषानुसार निष्कर्ष काढतात.केंद्रीय कृषी खात्याच्या अखत्यारितील भारतीय कृषी संशोधन परिषदेने याबाबतत डेटा संकलित करून वरील निष्कर्ष काढला आहे. त्यानुसार वर्ष

२०१८-२०१९ मध्ये जमिनीची धूप होण्याचे प्रमाण दरवर्षी दरहेक्टरी १० टनाहून अधिक असून यामुळे देशभरातील ४२.६१ दशलक्ष हेक्टर लागवडयोग्य क्षेत्र प्रभावित झाले. त्यात महाराष्ट्रातील ७६३१ हेक्टरचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक प्रभावित क्षेत्रात वाळवंटी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानचा (१० हजार २३८ हेक्टर) क्रमांक सर्वात वर आहे. 

त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो, हे येथे उल्लेखनीय. इतरही राज्यांना कमी अधिक प्रमाणात याचा फटका बसला आहे. का होते जमिनीची धूप? साधारणपणे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जमीन खरडून जाते, अतिउष्णतामानामुळे जमिनीला भेगा पडतात. या व तत्सम कारणांमुळे जमिनीचा कस कमी होतो. त्यामुळे उत्पादन क्षमताही कमी होते. ती वाढवण्यासाठी नंतर रासायनिक खतांचा वापरही वाढवला जातो.

देशातील प्रभावित लागवड क्षेत्र (वर्ष २०१८-२०१९)

राज्य हेक्टर

राजस्थान १०,२६८

महाराष्ट्र ७६३१.२५

गुजरात ४३३३.९८

कर्नाटक ४७४०.११

ओडिशा ४४३९

झारखंड ३९१३.११

तेलंगणा २८१२.२०

जमिनीची धूप झाल्याने तिचा कस कमी होतो. ती पूर्ववत होण्यासाठी शेकडो वर्षांचा काळ लागतो. अतिपावसामुळे जमीन खरडून जाणे, अति तापमानामुळे जमिनीला भेगा पडणे व तत्सम कारणांमुळे असे होते. ते थांबवायचे असेल तर मृदसंधारणाचे शास्त्रीय उपाय जिल्हास्तरावर राबवणे गरजेचे आहे

 

.-डॉ. शरद निंबाळकर, निवृत्त कुलगुरू, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

English Summary: Loss of 10 tons per hectare of agricultural land in the country every year
Published on: 05 May 2022, 07:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)