शेतीचा मुळ आधार आहे गाय, आणि ही गाय नष्ट झाली तर शेती व्यवस्था नष्ट होईल. व गरीब झालेले लोक ख्रिस्त होतील.आणि यासाठी १८२० साली गाईंच्या कत्तलीसाठी पहिला कत्तलखाना कलकत्त्याला सुरू झाला, आणि त्यानंतर गोवंशाची बेसुमार कत्तल झाली. देश स्वतंत्र झाल्यावर सुध्दा कत्तली चालूच राहिल्या. गोमांसाचे (मीट ) महत्त्व परदेशात वाढत गेले. यामुळं गेल्या २०० वर्षानंतर फक्त एक टक्का देशी गाय देशात शिल्लक आहे. हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र होतं व त्याला आमच्याच राज्यकर्त्यांनी नंतर मोठ्याप्रमाणात सहकार्य केले आहे.गोधन नष्ट करताना दूध कमी पडू नये म्हणून गेल्या ७० वर्षात जर्सी, होस्टन सारख्या गायींची पैदास वाढवली. यामुळं कॅन्सर सारखे रोग पसरले.कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात कॅन्सर ने थैमान घातले ते केवळ संकरित गाईच्या विषारी दुधामुळे आहे, हे आता सिद्ध झाले आहे. याबाबत सखोल संशोधन करणारे कणेरी मठाचे पूज्य काडसिद्धेश्र्वर महाराज म्हणतात.
१) संकरित गायीचं दूध विष आहे. तर देशी गाईचं दूध आईच्या दुधा प्रमाणे अमृत आहे.२) संकरित गाईच्या दुधामुळे शरीरातील इंद्रियां च्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो, तर देशी गाईच्या दुधामुळे प्रतिकारक्षमता वाढते व सर्व इंद्रिय उत्तम कार्यक्षम होतात.३) संकरित गाय भरपूर दूध देणाऱ्या म्हणून चौपट महाग आणि देशी गाय कमी दूध देते म्हणून स्वस्त आहे. पण संकरित गायींच्या दुधामुळे शरीर जर्जर व रोगग्रस्त होतं, ( मधुमेहाच प्रमाण वाढण्याचं एकमेव कारण हे दूध आहे) तर देशी गाईच्या दुधामुळे प्रतिकारक्षमता वाढल्याने शरीर मजबूत व व्याधिमुक्त होते.४) आज अनेक गर्भश्रीमंत कारखानदार, नटनट्या, उद्योगपती स्वतःच्या शरिरस्वास्थ्यासाठी एक हजार रुपये प्रति लिटर भावाने देशी गाईचे दूध, आठ ते दहा हजार रुपये किलो दराने तूप घेऊन खात आहेत. यांच्यासाठी खास देशी गाईचे गोठे तयार केले आहेत.भारतीय गीर (काठीयवाडी) गाय ब्राझीलमध्ये नेली,इथल्या वळूना त्यांनी नेलं, आणि संशोधन करून ६४ लिटर दूध देणारी गाय तयार केली. गीर, लाल सिंधी, साहिवाल, कांकरेज या भरपूर दूध देणाऱ्या गायींची पैदास राज्यकर्त्यांनी वाढवली नाही,
उलट संकरित गाईंच विषारी दूध पाजून परदेशी अँलोपथ्यी औषधांसाठी बाजारपेठ तयार करण्यासाठी या देशातील लोकांचे शरीर व्याधीग्रस्त कसे होईल याची व्यवस्था केली.मुळ भारतातून नष्ट नामशेष झालेली ब्राह्मण ही देशी गायींची जात फक्त अमेरिकेत आहे. या गायींची करोडो रुपये किंमत मोजून ऑस्ट्रेलिया, मलेशिया देश विकत घेत आहेत. परदेशातील शास्त्रज्ञांनी प्रत्येक प्रकारची गाय व वळूंना नेले. संशोधन करून गाय पैदास केली. उत्तम प्रकारचे दूध मिळवलं आणि आमच्या राज्यकर्त्यांनी विषारी दुधाच्या जर्सी, हॉस्टन सारख्या विषारी दुधाच्या गायींची पैदास करण्याचं कारस्थान करून आपल्याच जनतेला व्याधीग्रस्त केले आहे.जगात कोणत्याही गायीला वशिंड नाही फक्त भारतीय गायींना वशिंड आहे. या वशिंडात सूर्य किरणातील काही उपयुक्त किरण शोषून घेण्याची क्षमता आहे. या उपयुक्त किरणांमुळे गायीच्या जीन्स मध्ये प्राकृत शारीरिक प्रतिकारक्षमता तयार होते. ती क्षमता दुधात उतरते आणि असे पौष्टीक दूध मानवाला मिळते. देशी गाईचे दूध आईच्या दुधा इतकेच पौष्टीक शरीराचे उत्तम पोषण करणारे आहे, शिवाय मानव शरीर तंदुरुस्त व व्याधीमुक्त राहते. यामुळं पूर्वीच्या माणसांचं आयुष्यमान उत्तम होतं.
Published on: 07 June 2022, 05:10 IST