Agripedia

भारतातील शेतमालाचा उत्पादन खर्च हा इतर देशांचे तुलनेने जास्त का होत आहे?. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या मध्ये एक नंबर आहे

Updated on 27 December, 2021 3:47 PM IST

याचे कारण शोशिक पण व नाही सहन झाले की आत्महत्या करतात पण संघर्षाची तयारी कमी.

   महाराष्ट्रातील ५०%शेतकरी मुलांना लग्न करण्यासाठी मुली देखील मिळत नाहीत.ते बिना लग्नाचे मरतील हे वास्तव आहे.

(१)जगातील इतर देशातील रासायनिक खतांच्या किमती पेक्षा कित्येक पट महाग खते भारतात मिळतात व विशेष म्हणजे त्या खत कंपन्यांना अनुदान मिळते शेतकऱ्यांचे नावाने? यावर कुणीही बोलू नका.

(२)जगात रात्री ची वीज excess असते ती शेतीला फुकट मिळते,भारतात व त्यातल्यात्यात महाराष्ट्रात इतर साऱ्यांची चोरी मिळून शेतकऱ्यांचे माथी मारतात.

(३)जगात वाहतुकीला लागणारे डिझेल स्वस्त भारतात उत्पादन खर्च पेक्षा तीन पट टॅक्स लावून शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीस मिळते.

(४)जगात कीटकनाशक चे किमती ह्या अतिशय तुटपुंज्या भारतात त्यांच्या नफेखोरी वर नियंत्रण नाही.

(५)जगात शेती करणेसाठी कर्ज पुरवठा हा जवळ जवळ नगण्य व्याजावर केला जातो.भारतात व्याजावर व्याज लावून कर्ज फिटतच नाही.

   माझ्या शेतकऱ्यांवर आरोप करणाऱ्या मित्रानो भारतातील दिल्लीतील अधिकारी जगाच्या तुलनेने हा अत्याचार शेतकऱ्यांवर करतआहेतच व त्यात फुकट अन्नधान्य स्कीम साठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत यासाठी किमान आधारभूत किंमत ही कधीच २ते३%चे वर वाढवत नाहीत.खोटे सांगतात उत्पादन खर्चावर आधारित नफा देतो.

 आणि फक्त या कारणाने भारतातील शेतकरी जागतिक बाजारपेठेत टिकू शकत नाहीत.चुकून कधीतरी इतर देशातील शेतमालाचे भाव वाढलेत व आमच्या मालाला भाव मिळणार असे वाटायला लागले की निर्यात वर टॅक्स वाढवतात.बर हे सारे शेतकऱ्यांसाठी च फक्त.इतर धोरणे रोज बदलत नाहीत.

   बंधूंनो,महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या मध्ये एक नंबर आहे याचे कारण शोशिक पण व नाही सहन झाले की आत्महत्या करतात पण संघर्षाची तयारी कमी.

   महाराष्ट्रातील ५०%शेतकरी मुलांना लग्न करण्यासाठी मुली देखील मिळत नाहीत.ते बिना लग्नाचे मरतील हे वास्तव आहे.

   बंधूंनो माझी हात जोडून विनंती आहे तुमचे प्रेम कुणाही पक्षावर राहू द्या 

पण शेतकऱ्यांना व त्यांचे आंदोलनास बदनाम करु नका व तुमच्या पोरांचे भवितव्यासाठी संघटित पणे लढा ही विनंती.

लेख संकलित आहे.

एक शेतकरी

English Summary: Look at the children of farmers, how does an Indian farmer die?
Published on: 27 December 2021, 03:47 IST