प्रकाश सापळे : किड नियंत्रणासाठी एक उपयुक्त तंत्रज्ञान

Saturday, 11 August 2018 02:44 PM
प्रकाश सापळा

प्रकाश सापळा

खरीप व रबी हंगामातील विविध पिक व फळबाग यांच्यावरील प्रमुख हानिकारक कीटकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रासायनिक कीटकनाशकाचा वापर होतो. रासायनिक किटकानाशकाच्या अतिरेकी वापरामुळे सबंधित पिकामध्ये कीटकनाशकाचे अवशेष सापडतात व सोबतच प्राथमिक किडीमध्ये वाढलेली प्रतिकार शक्ती, दुय्यम किडीचा होणारा उद्रेक अशा अनेक समस्या आढळून येत आहे. भाजीपाला पिकांमध्ये तर रासायनिक कीडनाशकांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. पिकांमध्ये पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा वापर अधिक होत असतो. त्यामुळे पिकांतील मित्र कीटकांच्या संख्येवरही परिणाम आढळून येतो. रासायनिक कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे पिकांवर व वातावरणावर होत असलेले परिणाम यांच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड व्यवस्थापनातील अन्य घटकांचा वापर वाढावयास हवा.

पावसाळ्यात प्रामुख्याने अनुकूल वातावरणात किडींचा उपद्रव व प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात किडींच्या नर व मादीच्या मिलानामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नर व मादी हे प्रकाशाच्या किरणांकडे आकर्षित होत असतात. ह्या गोष्ठीला विचारात घेऊन कोणत्याही पिक हंगामाच्या सुरवातीपासून प्रकाश सापळे लावावे. प्रकाश सापळ्यांच्या मदतीने नर व मादी यांच्या प्रादुर्भावाला अटकाव करण्यास मदत होते. बाजारात वेगवेगळे प्रकारचे प्रकाश सापळे उपलब्ध आहेत. प्रकाश सापळे वापरण्यात सोपे असतात सोबतच लाभदायक कीटकासाठी हानिकारक नाही आहे. सोबतच काही प्रकाश सापळे सौर उर्जेवर सुद्धा चाललात.

प्रकाश सापळ्याचे महत्व :

 • प्रकाश सापळे पिकातील हानिकारक कीटकांना नियंत्रण करण्यात मदत करते.
 • हंगाम सुरु होण्याआधी प्रकाश सापळ्याचे वापर केल्यास पिक क्षेत्रातील पिकांवर प्रादुर्भाव करू शकणाऱ्या किडींचा अनुमान लावण्यात मदत होते.
 • प्रकाश सापळे मित्र कीटकांना सुरक्षित आहे.
 • प्रकाश सापळे पर्यावरणाला अनुकूल आहे. सापळे जाड प्लास्टिक ने बनले असल्यामुळे टिकाऊ आहेत.
 • प्रकाश सापळ्यांमुळे कमी वेळात हानिकारक कीटकांवर नियंत्रण मिळवता येतो.

पिकांमध्ये लावण्याची पद्धती :

 • प्रकाश सापळे पिकाच्या मध्यभागी लावावे उदा. १ प्रकाश सापळा प्रति हेक्टर.
 • पिकांपासून हे सापळे १.५ फुट उंच लावावे.
 • चांगल्या परिणामासाठी संध्याकाळी ७ ते ११ या दरम्यानच्या काळात चालू ठेवावे.

प्रकाश सापळ्याची उपयोगिता :

 • नर व मादी हे दोन्ही प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात त्यामुळे त्यांच्या मिलनाला अडथळा निर्माण होऊन येणाऱ्या नवीन पिढीला अटकाव करण्यास मदत होते.
 • प्रकाश सापळ्याची रचना असा प्रकारे केली जाते कि ज्यामुळे मित्रकीटक आकर्षित जरी झाले तरी त्यांना काही हानी पोहचत नाही.
 • प्रकाश सापळे हे बॅटरी वर सुद्धा चालू शकतात.
 • प्रकाश सापळ्याच्या उपयोगाने हानिकारक कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक कीटनाशकांचा वापर कमी होतो.

--------------------------------------------------------------

डॉ. निशांत उके, कु. शुभांगी खंदारे व अविनाश महाले

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.