प्रयोग शाळेत नत्र स्थिर करणाऱ्या, जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या जिवाणूंची स्वतंत्र्यरीत्या वाढ करून योग्य अशा वाहकात मिसळून तयार होणाऱ्या खताला ‘जिवाणू खत”असे म्हणतात.या जिवाणू खताला ‘जिवाणू संवर्धन, बॅक्टेरिअल
कल्चर” अथवा ‘बॅक्टेरिअल इनॉक्युलंट’ असेही म्हणतात.अधिक उत्पादन मिळवण्यासाठी अधिक उत्पादन देणारी पिके एकाच शेतात घेतली जातात.Productive crops are grown in the same field. त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता भासते.आपल्याकडील जमिनीत नत्राचे प्रमाण कमी
आहे. सेंद्रिय खताद्रारे नत्राचा पुरवठा करणे आवश्यक असते. कारण केवळ रासायनिक खतांद्वारे पुरवठाकरणे जमिनीच्या प्राकृतिक दृष्टीने योग्य नसते, त्यामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्म बिघडतात. अशा परिस्थितीत जैविक खतांचा उपयोग करणे महत्त्वाचे ठरते.
त्यातच रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो व पर्यायाने पिकाचे उत्पादन अपेक्षित प्रमाणात मिळत नाही. अशा परिस्थितीत जिवाणू खताच रासायनिक खतांना पूरक खते म्हणून वापर केल्यास अधिक फायदा मिळतो.
आयडीयल फौडेशन 18008330455
Published on: 15 September 2022, 08:30 IST