Agripedia

मी शरद केशवराव बोन्डे थोडे समजावून सांगतो.

Updated on 19 July, 2022 9:06 PM IST

मी शरद केशवराव बोन्डे थोडे समजावून सांगतो.मुळात आपण शेणखताचा वापर का करतो हे नीट समजून घेणे गरजेचे आहे. आपण शेणखत वापरतो कारण त्यात उपयुक्त सूक्ष्मजीवांची वाढ व्हावी, जमीन भुसभुशीत राहावी आणि जमिनीची योग्य प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढावी. हे सर्व तेव्हाच शक्य होते जेव्हा शेणखत पूर्णपणे कुजलेले असते.शेणखत न कुजलेले असेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. 

जेव्हा आपण असे शेणखत मुळांभोवती टाकतो तेव्हा त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरूच असते. ह्या कुजण्याच्या प्रक्रियेत शेणखताचे तापमान 65 ते 75 डिग्री सेल्सिअस च्या आसपास जाते. त्यामुळे झाडाच्या मुळांना शॉक बसतो अथवा इजा होण्याची शक्यता असते. परिणामी झाडाच्या उत्पादकतेत घट होते. कुठलीही गोष्ट कुजण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. असे शेणखत कुजताना जमिनीतील ऑक्सिजन घेत असते आणि झाडांच्या मुळांनादेखील ऑक्सिजन आवश्यक असतोच. 

परिणामी हे कुजणारे शेणखत जमिनीतील ऑक्सिजनचा साठा कमी करते आणि झाडाच्या मुळांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे झाडाच्या आत काही चुकीची संप्रेरके स्रवतात आणि हे झाडाच्या उत्पादनक्षमतेला मारक ठरते.जर ह्या कुजणाऱ्या शेणखताला ऑक्सिजन मिळाला नाही तर ते सडण्याची प्रक्रिया सुरू होते.If decaying dung does not get oxygen, it starts the process of decomposition.ह्या सडणाऱ्या शेणखतात उपद्रवी बुरशी वाढण्याचा धोका निर्माण होतो. न कुजलेल्या शेणखताचा फायदा न होता त्याने तोटेच अधिक होतात. आपल्या पिकाला फायदा होणे तर

दूरच, त्याची उत्पादकता कमी होऊन रासायनिक औषधांचा खर्च वाढतो.तसेच पीक काही दिवस पिवळे पडते.म्हणूनच शेणखत टाकताना ते पुर्ण कुजलेले असायला हवे. ते उपलब्ध नसल्यास, फक्त आपल्या समाधानासाठी न कुजलेले शेणखत हे न वापरलेलेच बरे.लेखक हे शेती प्रश्ना चे अभ्यासक आहेत.विशेष सुचना- या पोस्ट चा उद्देश शेतकरी यांच्यात जनजागृती करणे चा आहे. प्रत्येक शेतकरी नी निर्णय करतांना सर्व आपल्या परिस्थिती चा चांगला योग्य विचार करुनच वैयक्तिक पातळीवर निर्णय करावा.

 

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोंडे.

९४०४०७५६२८

English Summary: Let's friends know very useful information about cow dung
Published on: 19 July 2022, 09:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)