Agripedia

गेली अनेक वर्षे देशी गायीच्या शेणाच्या वापराबाबत अनेक प्रयोग, प्रचार, प्रसार करीत असताना असे लक्षात आले की,

Updated on 10 May, 2022 10:04 PM IST

गेली अनेक वर्षे देशी गायीच्या शेणाच्या वापराबाबत अनेक प्रयोग, प्रचार, प्रसार करीत असताना असे लक्षात आले की, शेणखतासोबतच गोमुत्राच्या वापराबाबतसुद्धा प्रयोग, प्रचार, प्रसार होणे आवश्यक आहे. कारण रासायनिक खतापेक्षा शेणखताचे महत्त्व आता शेतकऱ्यांना लक्षात आले आहे. केवळ शेणखताचा वापर करून उत्तम शेती करता येते, हे अनेक शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे रासायनिक खतावरील त्या शेतकऱ्यांचे परावलंबन पूर्णपणे संपले आहे. परंतु, विषारी कीटकनाशकांसाठी मात्र आणखी ठोस उपाय सापडत नाही. अनेक अभ्यासू शेतकरी कडूनिंब, लसूण, मिरची अशा अनेक पदार्थांच्या वापराचे प्रयोग आपापल्या अनुभवाने अनेक ठिकाणी करीत आहेत.गायीच्या मुत्राच्या संबंधात जेव्हा विचार केला, तेव्हा मला असे वाटले की गोमूत्र एकाच वेळेस तीन प्रकारे पिकाला मदत करू शकेल का? खत म्हणून, हार्मोन म्हणून व कीड व रोगनाशक म्हणून. यासंदर्भात अनेक पुरावे शोधले.

परंतु, काही ठोस व स्पष्ट संदर्भ मिळाला नाही. शेवटी हे काम यथाशक्ती आपणच करून पहावे, असे ठरवून कांदा, सीताफळ व शेवगा या तीन पिकांत हे प्रयोग केले. त्याचे अनुभव येथे मांडले आहेत.ज्या जमिनीवर कांदा घेतला गेला, ती जमीन मध्यम प्रतीची व कमी खोलीची १० ते १५ सेमी म्हणजे ४ ते ६ इंच होती. कांद्याचे बी वाफ्यामध्ये टाकून रोप तयार करण्यात आले.

हे ही वाचा - खरिप तयारी कापुस लागवड नियोजन

रोप सव्वा महिन्याचे होईपर्यंत वाफ्यातच ठेवले. लागवडीपूर्वी रोप वाफ्यामध्ये असताना पाच टक्के गामुत्राचे तीन फवारे मारले. रोप लागवडीपूर्वी शेतामध्ये दोन ट्रॉली शेणखत टाकून ते जमिनीत मिसळून घेतले. लागवडीनंतर पाचव्या दिवशी संपूर्ण पिकाला आंबवणीचे पाणी दिले. हे पाणी देताना प्रत्येक वाफ्याला एक ओंजळभर शेण पाण्यातून मिसळून दिले. त्यानंतर पाच दिवसांनी वरीलप्रमाणे गायीचे शेण या प्रमाणे दिले. त्यानंतर दर आठ ते दहा दिवसांनी पाणी देण्याआधी दहा टक्के गोमुत्राचा फवारा कांदा पिकाला मारला. कांद्याच्या पिकामध्ये घरगुती वापरासाठी मेथीचे आंतरप‌कि घेतले. कांद्याचे पीक निघेपर्यंत इतर कोणताही रासायनिक फवारा किंवा कीटकनाशक वापरले नाही. कांदा काढल्यानंतर कांद्याला उत्तम रंग आला.

त्यामुळे बाजारभावापेक्षा माझ्या कांद्याला प्रतिकिलो तीन रुपये जादा दर मिळाला. प्रायोगिक शेतीवर तुलनात्मक अभ्यास जरी करता आला नाही तरी कांद्यावर गेल्यावर्षी आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या कांद्यावर बऱ्याच प्रमाणात रोग आला होता. परंतु, गोमूत्र वापरलेल्या शेतामध्ये कांद्यावर कोणताही रोग किंवा कीड आली नाही. त्याचप्रमाणे कांदे काढत असताना एकही सडका किंवा कुजका कांदा निघाला नाही. तसेच आकारही प्रमाणबद्ध होता. शिवाय जमीन हलकी असूनही जवळपास एकरी ७५ क्विंटल कांदा निघाला.सात ते आठ वर्षे वयाच्या पंधरा ते वीस सीताफळाच्या झाडांवर गोमुत्राचा प्रयोग केला. तसेच शेणखतही दिले. डिसेंबर, जानेवारीमध्ये झाडांची पानगळ होऊन नवीन पालवी फुटण्याच्या सुमारास सर्व झाडांना दहा टक्के गोमुत्राचा फवारा मारला. त्यानंतर कळ्या फुटल्यावर दहा टक्के तीन ते चार आठवड्यांनी दुसरा फवारा मारला. त्यानंतर पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये एकही फवारा मारला नाही. फळे तयार झाल्यावर असे निदर्शनास आले की फळावर दरवर्षीच्या फळापेक्षा वेगळीच चकाकी आली आह. 

फळात गराचे प्रमाण जास्त असून, चवीला अतिशय गोड आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी झाडांना आलेल्या फळांपेक्षा यावर्षीच्या फळांचा आकार बराच मोठा होता. प्रत्येक फळ साधारणतः पाचशे ते सहाशे ग्रॅम वजनाचे भरले. काही फळे नाशिक मार्केटला पाठवली असता त्यांना १०० ते १२० रुपये किलोपर्यंत भाव मिळाला. सीताफळप्रमाणेच केसर गावठी आंब्याच्या झाडावरही असाच प्रयोग केला. आंब्याला पालवी फुटण्याच्या वेळेस फुलोरा येण्याच्या वेळी दहा टक्के गोमुत्राचा फवारा मारला गेला होता. त्यातही आंब्याच्या झाडावर रोग व कीड आढळली नाही. फळेही भरपूर लागली. शेवगा पिकामध्ये छाटणीनंतर दहा टक्के गोमुत्राचा फवारा पंधरा दिवसांच्या अंतराने मारला. त्यामुळे कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाची गरज पडली नाही. गोमुत्रामध्ये पिकाची वाढ व उत्पन्नावर निश्चित चांगले परिणाम करणारी द्रव्य आहेत. आपणही पडताळून पहा.

 

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोंडे.

९४०४०७५६२८

ध्येय मातीला वाचवणं

Save the soil all together

English Summary: Let us know the experiments of cow urine on crops
Published on: 10 May 2022, 03:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)