Agripedia

कापशी तलाव येथे लिंबू उत्पादक शेतकन्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

Updated on 04 August, 2022 6:09 PM IST

कापशी तलाव येथे लिंबू उत्पादक शेतकन्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजनलिंबू उत्पादक शेतकरी बांधवानी अधिक आर्थिक उत्पन्नासाठी उन्हाळ्यामध्ये विक्री होत असलेल्या फळासाठी हस्त बहराचे नोयोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे असे प्रतिपादन श्री गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) कृषि विज्ञान केंद्र,

अकोला यानी ग्राम कापशी तलाव येथे लिंबू प्रशिक्षणा दरम्यान केले.कृषि विज्ञान केंद्र. अकोला द्वारे दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी ग्राम कापशी तलाव येथे लिंबू फळपिका मध्ये हस्त बहराचे नियोजन कश्या पद्धतीने करावे या साठी एक दिवशीय प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. आपल्या प्रशिक्षणामध्ये पुढे बोलताना श्री

गजानन तुपकर विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) कृषि विज्ञान केंद्र, अकोला यानी सांगितले कि लिंबू या पिकाला वर्षातून तीन हि बहार येतात परंतु मृग आणि आंबिया बहारापासूनच्या फळांना जास्त बाजारभाव मिळत नसल्याने जास्त नफा शेतकर्यांना मिळत नाही परंतु हस्त बहार ची फळे बाजारात उन्हाळ्यात विक्री

साठी येत असल्याने आणि भरपूर मागणी असल्याने शेतकर्यांना आर्थिक दृष्ट्या हा बहार भरपूर नफा देऊन जातो. शेतकरी बांधवांनी हस्त महार नियमित करण्यासाठी मृग बहार येऊ न देणे साठी उपाय,Measures to prevent deer from coming out to regularize Hasta Mahar by farmers. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सायकोसील किंवा लिहोसीन फवारणी, खताचे महिनावार नियोजन, लिंबू वरील महत्वाच्या किडी आणि रोगांचे प्रभावी

व्यवस्थापन या विषयी सविस्तर शेतकर्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान काही लिंबू उत्पादक शेतकर्यांना प्रथम रेषीय पिक प्रात्यक्षिक कार्यक्रम अंतर्गत आवश्यक निविष्ठांचे वितरण करण्यात आले.शेतकरी बंधूनी लिंबू पिकामधील विविध समस्या मांडल्या त्या समस्येवर श्री गजानन तुपकर यांनी

शेतक-यांचे प्रक्षांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील श्री पुरुषोत्तम चतरकर, माजी सरपंच, श्री पुरुषोत्तम येवले, श्री किशोर मानतकर आणि भरपूर लिंबू उत्पादक शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी रावे चे विद्यार्थी श्री शाम काळे, ओम खंडार, प्रथमेश कराळे यांनी अथक परिश्रम घेतले.

English Summary: Lemon farmers should join hands for more income - Orchard expert Gajanan Tupkar
Published on: 04 August 2022, 06:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)