Agripedia

महाराष्ट्रातील अनेक शेतकरी भेंडीचे उत्पादन घेत असतात परंतु उत्पादन घेत असताना भेंडी पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. चला तर जाणून घेऊया भेंडी वरील वेगवेगळे रोग व प्रतिरोधक वान

Updated on 11 January, 2022 1:50 PM IST

महाराष्ट्रातील अनेक शेतकरी भेंडीचे उत्पादन घेत असतात परंतु उत्पादन घेत असताना भेंडी पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. चला तर जाणून घेऊया भेंडी वरील वेगवेगळे रोग व प्रतिरोधक वान

 फुले विमुक्त:-

येलो व्हेन मोझॅक विषाणू रोग प्रतिरोधक भेंडी जातीची फुले विमुक्ताची शिफारस केली जाते.आकर्षक हिरव्या रंगाची फळे, चमकदार,पिवळ्या शिरा मोज़ेक विषाणू रोगास प्रतिरोधक, पांढऱ्या माशी, जॅसिड्स आणि फळ पोखरणाऱ्या अळीस सहनशील

पुसा सावनी:-

 आय.ए. आर.आय विकसित जात फ़ळे १०-१५ से.मी लांब हिरवी मुलायम झाडावर काटेरी लव देठावर तांबूस छटा फुले पिवळी व प्रत्येक पाकळीवर पिवळा ठिपका,

सुरुवातीला येलो मोझॅक व्हायरस रोगास प्रतिकारक परंतु सद्या व्हायरस रोगास बळी पडते. व्हेक्टरी ८-१० टन उत्पादन.

परभणी क्रांती :-

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित जात. फळे ७-१० सेमी लांब हिरवी पुसा सावनी पेक्षा कणखर व व्हायरस रोगास प्रतिकारक,फळे नाजूक तजेलदार हिरवी.पेरणी पासून ५५ दिवसात पहिला तोडा सुरु होतो. उन्हाळ्यात १४-१६ तोडे तर खरिपात २० तोडे होतात.व्हेक्टरी ७-८ टन उत्पादन.

अंकुर ४०:-

 सरळ वाढणारी जात.पेरांमधील अंतर कमी फळे हिरवी.व्हेक्टरी ८-१० टन उत्पादन.

महिको 10:-

 अधिक लोकप्रिय जात.फळे गर्द हिरवी.व्हेक्टरी १०-१२ टन उत्पादन.

वर्षा:-

अधिक लोकप्रिय जात.लांबी ५-७ सेमी फळे हिरवी व लुसलूशीत तोडल्यानंतर काळी पडत नाहीत.व्हेक्टरी १० ते १२ टन उत्पादन.

अर्का अनामिका:-

 झाड उंच फळे लांब कोवळी हिरवी, फळाचा देठ लांब. व्हायरस रोगास प्रतिकारक. फळे तोडण्यास सोईस्कर. हेक्टरी 9-12 टन उत्पादन

पुसा सावनी:-

 आय.ए. आर.आय विकसित जात फ़ळे १०-१५ से.मी लांब हिरवी मुलायम झाडावर काटेरी लव देठावर तांबूस छटा फुले पिवळी व प्रत्येक पाकळीवर पिवळा ठिपका,सुरुवातीला येलो मोझॅक व्हायरस रोगास प्रतिकारक परंतु सद्या व्हायरस रोगास बळी पडते. व्हेक्टरी ८-१० टन उत्पादन.

अंकुर ४०,पुसा सावनी,महिको १०,परभणी क्रांती,वर्षा, अर्का अनामिका यासोबत सिलेक्शन २-२,फुले उत्कर्षा,या सुधारित जाती लागवडीस योग्य आहेत.

 

- IPM school

English Summary: Ledifiger disease and resistant variety
Published on: 11 January 2022, 01:50 IST