Agripedia

कृषिप्रधान असलेल्या भारतात हरित क्रांतीनंतर शेतीसमोर आव्हान म्हणून पुढे आलेली आहे, ती म्हणजे शेतीमध्ये होत असलेली रासायनिक कीटकनाशके व खते यांचा भरमसाठ वापर उत्पादनाच्या हव्यासापोटी संकरित वाणांचा वापर वाढला.

Updated on 29 August, 2020 12:29 PM IST


कृषिप्रधान असलेल्या भारतात हरित क्रांतीनंतर शेतीसमोर आव्हान म्हणून पुढे आलेली आहे, ती म्हणजे शेतीमध्ये होत असलेली रासायनिक कीटकनाशके व खते यांचा भरमसाठ वापर उत्पादनाच्या हव्यासापोटी संकरित वाणांचा वापर वाढला.  या वानामध्ये रोगप्रतिकारक क्षमता अतिशय कमी आहे म्हणून कीटकनाशक, बुरशीनाशक यांचा वापर बेसुमार वाढला या साऱ्यांचा परिणाम मानवी आरोग्यावर सुद्धा होत आहे.   कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर पर्यावरणाला सुद्धा घातक ठरत आहे, अशावेळी एकात्मिक कीड नियंत्रणाचा मार्ग आजच्या काळात महत्त्वाचा झालेला आहे . एकात्मिक कीडनियंत्रणातील महत्त्वाचा घटक म्हणून सापळा पिकाचे महत्व आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

सापळा पीक म्हणजे काय?

मुख्य पिकांमध्ये किडीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावली जाते.  या पिकाकडे कीड आकर्षित होते व परिणामी मुख्य पिकावरील किड कमी होण्यास मदत होते व  पीकसंरक्षण होते अशा पिकास सापळा पीक म्हटले जाते.

सापळा पीक वापरण्याची तत्वे

१) सापळा पीक किडींना आकर्षित करणारे असावे.

२) मुख्य पिकाच्या शेतातील कालावधीत सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत किडींना आकर्षित करणारे असावेत.

३) सापळा पिकावरील किडी चे अंडीपुंज व किडी गोळा करून नष्ट करावे.

४) सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे.  किंवा त्यावर कीटकनाशकाची फवारणी करावी.

महत्वाच्या पिकातील सापळा पिके -

मुख्य पीक       सापळा पीक नियंत्रण
कापूस        चवळी              मावा
कापूस          झेंडू               हिरवी बोंडअळी
सोयाबीन      एरंडी              उंटअळी, केसाळ अळी
तुर             ज्वारी              घाटेअळी, सुत्रकृमी
भुईमूग        सूर्यफूल          केसाळ अळी, घाटेअळी
टोमॅटो         झेंडू               फळ पोखरणारी अळी
ऊस            चवळी            मावा

सापळा पिकाचे फायदे

१)कीडनाशकाचा वापर कमी होतो.

२) मित्र कीटकांचे संवर्धन होते.

३) पीक संरक्षणाचा खर्च कमी होतो.

४) पर्यावरणाचे संरक्षण होते.

५) सापा पिकातून अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.

 

लेखक  -

पुजा लगड

Msc ( Agri)

 

महेश गडाख

Msc ( Agri)

 

समर्थ तुपकर

Bsc ( Agri)

English Summary: Learn what the importance of safala crop
Published on: 29 August 2020, 12:29 IST