कार्य/महत्त्व-
जस्तामुळे झाडांना प्रथिने निर्मितीस चालना मिळते व संजीवके तयार होतात. प्रामुख्याने इंडॉल असेटिक (आयएए) असिडच्या निर्मितीत सहकार्य करते, ज्यामुळे पिकाची शेंड्याची वा जोमदार होण्यात मदत मिळते.
प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते. तसेच पिकामधिल शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे.
झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे.
झिंक बिज (सीड) आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते.
झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे.
पिकाच्या पेशीमधिल योग्य प्रमाणातील झिंक च्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखिल तग धरुन राहते.
झिंकच्या उपल्धतेवर परिणाम करणारे घटक-
जमिनीचा सामु- मातीचा सामु जास्त असल्यास झिकची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही, असिडीक स्वरुपातील झिंकचा वापर करुन हि कमतरता दुर करता येते.
झिंकच्या उपल्धतेवर परिणाम करणारे घटक-
जमिनीचा सामु- मातीचा सामु जास्त असल्यास झिकची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही, असिडीक स्वरुपातील झिंकचा वापर करुन हि कमतरता दुर करता येते.
झिंक आणि स्फुरद (फॉस्फोरस)चे गुणोत्तर - जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते. नत्राची कमी प्रमाणातील उपल्बधता पिकाच्या वाढीवर करित असलेल्या दुष्परिणांमुळे ईतर अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते, हाच परिणाम झिंक वर देखिल लागु पडतो.
सेंद्रीय पदार्थ - जमिनीतील सेंद्रीय पदार्थ झिंक चा पुरवठा करीत असतात.तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे इनऑरगॅनिक स्वरुपातील जस्ताचे चिलेशन होवुन त्याची पिकास उपल्बधता वाढते. जमिनीतील जास्त प्रमाणातील पाण्यामुळे झिंकची उपल्बधता कमी होते.
झिंक व तांबे (कॉपर)चे गुणोत्तर - पिक झिंक व कॉपर एकाच पध्दतीने शोषुन घेत असल्या कारणाने जर एकाचे प्रमाण वाढले तर दुस-याची कमतरता जाणवते.
झिंक व मॅग्नेशियमचे गुणोत्तर - मॅग्नेशियमच्या वापराने झिंक चे पिकाद्वारा शोषण वाढते.
कमतरतेची लक्षणे -
फळझाडांना पाने कमी लागतात व झाडांची वाढ खुंटते.
गहू या पिकात पानांवर कथिया रंगाचे डाग पडतात.
मका या पिकामध्ये पानाचा अर्धा भाग पांढरा होतो. कणसांमध्ये दाणे भरत नाहीत.
जस्ताची कमतरता विशेषतः धान्य पिकांमध्ये (मका, ज्वारी, सोयाबीन) व भाजीपाल्यामध्ये टोमॅटोत अधिक असते. पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात.
विविध स्त्रोत -
उत्पादन -- रासायनिक फॉर्म्युला -- सर्वसाधारण झिंकचे प्रमाण
झिंक सल्फेट -- ZnSO4-H2O -- 36%
झिंक ऑक्झि सल्फेट -- Zn0-Zn SO4 -- 38-50%
झिंक ऑक्साईड -- ZnO -- 50-80%
झिंक क्लोराईड -- ZnCl2 -- 50%
झिंक (इ.डी.टी.ए.) चिलेट -- ZnEDTA -- 6-14%
झिंक ( एच.ई.डी.टी.ए.) चिलेट -- ZnHEDTA -- 6-10%
माती परीक्षणानुसार हेक्टरी १० ते २० किलो झिंक सल्फेट जमिनीतून देणे किंवा अर्धा ते १ किलो झिंक सल्फेट प्रति १०० लिटर पाण्यातून पिकावर फवारावे.
संकलन - विनोद भोयर
Published on: 10 October 2021, 10:43 IST