Agripedia

क्लोरीनचे कार्य सर्वसाधारपणे जमिनीमध्ये पिकांना लागणारी क्लोरीनची कमतरता व्यापक प्रमाणावर दिसत नाही.

Updated on 15 June, 2022 7:30 PM IST

क्लोरीनचे कार्य सर्वसाधारपणे जमिनीमध्ये पिकांना लागणारी क्लोरीनची कमतरता व्यापक प्रमाणावर दिसत नाही. मात्र नारळ आणि पाम ऑइल पिकांना क्लोरिनची गरज भासते. क्लोराइडयुक्त खतांच्या वापरातून त्याची पूर्तता करता येते.वनस्पतीतील कार्य - प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या वेळी प्राणवायूची निर्मिती करण्याच्या कामी क्लोरिनची गरज असते. पालाश आणि क्लोरीन एकत्रित प्रकाश संश्लेषण क्रिया योग्यरीत्या कार्यरत ठेवतात. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवेळी पेशीतील रसाकर्षण दाब उंचावतो. पेशीकोशातील आर्द्रता टिकविली जाते. वनस्पती मधील संप्रेरके कार्यान्वीत करण्याचे काम, तसेच पानावर जी छिद्रे असतात

(माणसाच्या त्वचेवर असतात तशी) ती छिद्रे उघडणे आणि बंद होण्याच्या कामी क्लोरीन मदत करतो. त्याबरोबरच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकामधील वहन क्षमता आणि पिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे कार्य क्लोरीन वायू करतो. क्लोरीनचा योग्य वापर केल्यास धान्य पिकांच्या उत्पादनात चांगली वाढ होते.कमतरतेची लक्षणे - क्लोरिनच्या कमतरतेमुळे रोपे पिवळी पडतात किंवा मर, सड, कुज या रोगांची लक्षणे दिसून येतात. नवीन पानांमध्ये पिवळेपणा दिसतो. पाने निस्तेज होतात. टोमॅटोच्या पानाच्या कडा क्लोरिनच्या कमतरतेमुळे करपतात. क्लोरीन अन्नद्रव्ये जास्त झाल्यास स्फुरद शोषणामध्ये विशेष अडथळा निर्माण होतो. 

कमतरतेची लक्षणे - क्लोरिनच्या कमतरतेमुळे रोपे पिवळी पडतात किंवा मर, सड, कुज या रोगांची लक्षणे दिसून येतात. नवीन पानांमध्ये पिवळेपणा दिसतो. पाने निस्तेज होतात. टोमॅटोच्या पानाच्या कडा क्लोरिनच्या कमतरतेमुळे करपतात. क्लोरीन अन्नद्रव्ये जास्त झाल्यास स्फुरद शोषणामध्ये विशेष अडथळा निर्माण होतो.खते - म्युरेट ऑफ पोटॅश सारखी खतांमधून क्लोरीन अधिक मिळतो. त्यामुळे रासायनिक खतांच्या मात्रा जपून आणि गरजेप्रमाणेच द्याव्या लागतात. क्लोरिनची कमतरता असेल तरी त्याची लक्षणे क्लोरिनचे प्रमाण हवेत भरपूर असते तसेच पावसाच्या पाण्यात हि असते त्यामुळे ते स्वतंत्रपणे द्यावे लागत नाही. क्लोराईडयुक्त खतांपासून जे मिळते ते पुरेसे असते.

खते - म्युरेट ऑफ पोटॅश सारखी खतांमधून क्लोरीन अधिक मिळतो. त्यामुळे रासायनिक खतांच्या मात्रा जपून आणि गरजेप्रमाणेच द्याव्या लागतात. क्लोरिनची कमतरता असेल तरी त्याची लक्षणे क्लोरिनचे प्रमाण हवेत भरपूर असते तसेच पावसाच्या पाण्यात हि असते त्यामुळे ते स्वतंत्रपणे द्यावे लागत नाही. क्लोराईडयुक्त खतांपासून जे मिळते ते पुरेसे असते.पोटॅशिअम क्लोराइड(४७ टक्के क्लोराईड)अमोनियम क्लोराइड (५२ टक्के क्लोराइड) मॅग्नेशियम क्लोराइड (७४ टक्के क्लोराइड).वापरण्याची पद्धत - पिकांच्या पेरणीपूर्वी जमिनीवर फेकून किंवा वरखते म्हणून नत्राबरोबर क्लोराइडचा वापर करता येतो.

English Summary: Learn the function of chlorine
Published on: 15 June 2022, 04:58 IST