कडधान्ये तसेच तेल वर्गीय पिकांमध्ये अनुक्रमे प्रथिनांचे आणि तेलाचे प्रमाण या अन्नद्रव्यामुळे वाढते. वनस्पतीतील गंधकयुक्त अॅमिनो आम्ले (उदा. मिथिओनिन, सिस्टिन) तसेच वाढ नियंत्रकांच्या (उदा. थायमिन, बायोटिन) निर्मितीसाठी गंधक उपयोगी पडते. नत्र स्थिरीकरण जास्त होते, शोषण जवळजवळ स्फुरदाएवढेच केले जाते, कृषिमालाचा दर्जा सुधारतो. म्हणून नत्र, स्फुरद आणि पालश नंतर चौथे मुख्य अन्नद्रव्य म्हणून अलिकडे गंधकाचा उल्लेख केला जातो.
सल्फर हे झाडाच्या विविध चयापचय प्रकिया जसे प्रकाशसंश्लेषण,नत्र स्थिरीकरण यामध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याने पिकास गंधक उपलब्ध करून देणे गरजेचे असते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत मॅग्नेशियम सोबत थोड्या प्रमाणात गंधक सहभागी होते. हरितद्रव्य निर्मितीसाठी हातभार लागतो. परिणामी झाडात अन्ननिर्मिती उत्तम प्रकारे होते.यासोबतच सल्फर हे पीक संरक्षनामध्ये खूप उपयोगी पडते.
गंधकामध्ये बुरशीच्या बीजाणुंचा नाश करण्याची शक्ती असते.
पाण्यात विरघळणारे सल्फर स्पर्षशील बुरशीनाशक(Sulphur 80%WP) म्हणून चांगल्या प्रकारे काम करते.
विशेषतः बुरी म्हणजेच पाऊडरी मिल्ड्यू या बुरशीजन्य रोगावर परिणामकारक ठरते.सोबत कोळीनाशक(Miticide)म्हणून सुद्धा गंधक काम करते.
लेखक - वैभव पाटील,सोलापूर,प्रणव पिंजरे,कोल्हापूर,हरीश लेंडे,अमरावती,राहूल उभाले,अचलपूर,शरद बोंडे,अचलपूर,शशिकांत वाघ,जळगाव,मिलिंद जि गोदे,अचलपूर,विराज ठाणेकर, कोल्हापूर
-Team IPM SCHOOL
Published on: 16 October 2021, 07:06 IST