प्रत्येक फळ हे त्या त्या सिजन नुसार येत असते मात्र केळी हे असं एक फळ आहे जे बारमाही येत असते. केळी ला कोणताही सिजन नसतो ते तिन्ही असते. मात्र आंबा, द्राक्षे, सीताफळ तसेच टरबूज याना ठरलेला सिजन आहे. केळीची लागवड करण्याची असेल तर त्यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे जे की टिशू कल्चर हा प्रकार निवडला तर चांगले आहे. या पद्धतीत अगदी शंभर टक्के फळधारणा लागते आणि उत्पादन सुद्धा चांगल्या प्रकारे निघते. जगात भारत हा केळी उत्पादन मध्ये दुसऱ्या नंबर चा देश आहे तर महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकावर लागते. योग्य सिजन ला माल लागला की चांगला भाव ही मिळतो आणि उत्पादनही लागते मात्र बाजारपेठेत जास्त प्रमाणात आवक झाली तर शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोसळते. केळी ची लागवड उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ऋतूंमध्ये केली तर फायद्याचे ठरणार आहे.
बिगर मोसमी केळी लागवडीचे फायदे :-
पावसाळी केळी ची लागवड सर्वसामान्य जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात करावी. नुकताच उन्हाळा संपून पावसाळ्याची सुरुवात झालेली असते त्यामध्ये हवामान दमट व आद्रता निर्माण झालेली असते. या वातावरणात रोपांची वाढ जोमाने होते तसेच या वातावरणात जोपासलेली केळी निर्यातीस उपयुक्त ठरतात. आंबा, द्राक्षे आणि टरबूज या फळांचा सिजन संपल्यामुळे केळी ला बाजारभाव सुद्धा चांगला मिळतो.
हिवाळ्यात केळीची लागवड :-
पावसाळा झाला की केळीच्या लागवडीसाठी शेतजमीन योग्य झालेली असते. जमिनीची हलक्या प्रकारे मशागत करून केळी ची लागवड करावी जे की रोपांची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे होते आणि किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढत नाही. नोव्हेंबर, डिसेंम्बर, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याच्या दरम्यान या केळीची लागवड केली जाते. पावसाळा संपला किंवा जमिनीत ओलावा कमी होतो व जमीन वापसा स्थितीत असते. या दरम्यान रोपे लावली की जमिनीत ते लगेच सेट होतात आणि थंडीमुळे रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव पडत नाही.
उन्हाळी केळी लागवड :-
पाण्याचा साठा योग्य प्रमाणात असेल तर उन्हाळ्यात केळीचे लागवड केली जाते. योग्य प्रकारे जमिनीची मशागत करून केळी लागवड करावी. रोपांच्या वाढीसाठी उन्हाळ्यातील वातावरण पोषक असते जे की उन्हाळ्यात जमिनी वापसा सुद्धा देतात. उन्हाळ्यात लागवड केलेले फळ उन्हाळ्यात च काढायला येते त्यामुळे बाजारात भाव देखील चांगला भेटतो. त्यामुळे उन्हाळ्यात जरी तुम्ही बाग धरली तरी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे.
Published on: 21 January 2022, 06:15 IST