रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकामध्ये हरभरा हे पीक आहे. हरभऱ्याचा उपयोग दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळं बाजारात सुद्धा याला नेहमी मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळं रब्बी हंगामात हरभरा पिकास जास्त प्राधान्य दिले जाते.
रब्बी हंगामात हरभरा उतपादन वाढीसाठी काही महत्वाच्या गोष्टी:-
1)सुधारित वाणांचा उपयोग करावा, ज्याची रोग प्रतिकारक शक्ती जास्त असेल.
2)जमिनीची योग्य मशागत करावी सोबतच काळ्या जमिनीची निवड करावी
3) योग्य वेळेवर पिकास पाणी आणि खत पुरवठा
4) पेरणीवेळी पीकामधील योग्य अंतर
5)रोगराई आणि कीड पासून पिकाचे रक्षण
जमीन आणि पोषक हवामान:-हरभरा पिकासाठी काळी तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन वापरावी. पाणथळ आणि क्षारयुक्त जमिनीत हरभऱ्याची पेरणी टाळावी. तसेच हरभरा पिकासाठी थंड आणि कोरडे हवामान आवश्यक असते. या बरोबरच स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा हा गरजेचा
असतो.
जमिनीची मशागत करताना कोणती काळजी घ्यावी:
हरभऱ्याची मुळे खोलवर जात असतात त्यामुळं मशागत करताना जमीन एकदम भुसभूषित बनवावी. तसेच हेक्टरी 4 ते 5 टन शेणखत घालावे. तसेच योग्य प्रमाणात आणि वेळेत पिकास पाणी देणे सुद्धा खूपेप आवश्यक आहे.
पेरणीची योग्य वेळ:- हरभरा रणी ची योग्य वेळ ही सप्टेंबर च्या शेवटी किंवा 10 ऑक्टोबर पर्यंत करणे महत्वाचे आहे.
पेरणीसाठी बियांचे प्रमाण:-
हरभरा पेरणीसाठी बियांचे प्रमाण हे एक हेक्टर ला 100 किलो बियाणी वापरावे. तसेच काबुली जाती करीता 125 ते 130 किलो बियाणांचा वापर करावा.
हरभरा पिकासाठी बियाणांच्या सुधारित जाती:-
सुधारित बियाणांमध्ये विजय,विशाल,दिग्विज,विराट कृपा, पिकेव्हिके-2, पिकेव्हिके -4,बिडीएनजी -७९७, साकी-९५१६,जाकी -९२१८ या वाणाच्या बियाणांचा वापर करावा.
Published on: 11 November 2021, 02:46 IST