Agripedia

कापूस पिकास 650-1100 मि.मी. पाणी लागते. कापूस पिकाची लागवड देखील विभिन्न प्रकारच्या जमिनीवर होत आहे.

Updated on 21 June, 2022 4:46 PM IST

कापूस पिकास 650-1100 मि.मी. पाणी लागते. कापूस पिकाची लागवड देखील विभिन्न प्रकारच्या जमिनीवर होत आहे. त्याचबरोबर सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या जाती वेगवेगळया कालावधीमध्ये पक्व होतात. कापूस पिकास जमीन, हंगाम, हवामान व वाणाचा कालावधी यानुसार सिंचनाची गरज कमी जास्त होते.महाराष्ट्रामध्ये कपाशीस हंगामानुसार 200-700 मि.मी. सिंचनाची गरज लागते. कापूस पिकास एकूण पाण्याच्या गरजेपैकी उगवणीपासून पाते लागण्यापर्यंत 20%, पाते लागणे ते फुले लागण्याच्या काळात 40%, फुले लागणे ते बोंडे लागण्यापर्यंत 30% व बोंडे लागणे ते शेवटची वेचणी होईपर्यंत 10% पाण्याची गरज लागते.

म्हणजेच सुरुवातीच्या काळात कापसासाठी पाण्याची गरज कमी असते. पाते लागण्यापासून बोंडे लागण्यापर्यंत कपाशीसाठी पाण्याची गरज सर्वाधिक असते. त्यानंतर परत पाण्याची गरज कमी होते. सुरुवातीच्या काळात जर पावसाचे प्रमाणे जास्त झाल्यास झाडाची व मुळांची वाढ खुंटते. फुले लागणे व बोंडे भरण्याच्या काळात पाण्याची कमतरता असल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. या काळात पाण्याचा ताण पडल्यास संरक्षित पाण्याची सोय करावी.बागायती बी टी कापसाची पेरणी मे महिन्याच्या अखेरीस करण्यात येते. पेरणीनंतर पाऊस पडेपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार 8 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

बागायती बी टी कापसाची पेरणी मे महिन्याच्या अखेरीस करण्यात येते. पेरणीनंतर पाऊस पडेपर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार 8 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पीक वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाची गरज प्रामुख्याने पावसाच्या पाण्यानेच भागते. जर पावसाचा खंड पडल्यास पिकास पाणी द्यावे. पाते, फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास पाते, फुले व बोंडे गळण्याची शक्यता असते. पाते लागणे, फुले लागणे, बोंडे लागणे व बोंडे फुटणे या पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था आहे. या पीक वाढीच्या अवस्थवेळी पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

पाते लागणे, फुले लागणे, बोंडे लागणे व बोंडे फुटणे या पीक वाढीच्या महत्वाच्या अवस्था आहे. या पीक वाढीच्या अवस्थवेळी पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. झाडावरील 30-40% बोंडे फुटल्यानंतर पाणी देणे बंद करावे.ठिबक सिंचन पध्दतीने पाण्याची जवळपास 50% बचत होते. त्याचबरोबर उत्पादनामध्ये 35-40% वाढ होते. कपाशीच्या धाग्याचा गुणधर्मामध्ये सुधारणा होते.कोरडवाहू लागवडीमध्ये पावसाचा ताण असल्यास उपलब्धतेनुसार संरक्षित पाणी द्यावे. अशावेळी एक सरी आड याप्रमाणे पाणी दिल्यास उपलब्ध पाण्यामध्ये अधिक क्षेत्रास संरक्षित सिंचन देणे शक्य हेाते.

English Summary: Learn now, water management
Published on: 21 June 2022, 04:46 IST