Agripedia

कोणतेही पीक शेतात पिकवायचे असले तर त्यासाठी पोषक वातावरण आवश्यक असते. जसे की रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम. मोहरी हे एक रब्बी हंगामातील पीक आहे. मोहरीच्या पेरणीसाठी 30 सप्टेंबरपासून ते 20 ऑक्टोंबरपर्यंतचा काळ हा पोषक असतो.30 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर पर्यँत चा काळ हा मोहरीच्या पिकाची पेरणी करण्यासाठी पोषक असतो. कारण या वेळेतील वातावरण हे मोहरीसाठी उपयुक्त असते. काही वेळेस अचानक येणाऱ्या नैसर्गिक अडचणी, आणि पाऊस यामुळे मोहरीची पेरणी नाही करता आली की 10 नोव्हेंबर पर्यँत आपण मोहरीची पेरणी करू शकतो.

Updated on 21 October, 2021 1:35 PM IST

औषध मिसळल्यामुळे मोहरीची उगवण क्षमता वाढते:

शेतकऱ्यांनी मोहरीच्या पेरणीसाठी आरएच-9801 आणि आरएच-30 या प्रजातीच्या बियाणांचा वापर करावा. त्यासाठी शास्त्रज्ञांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे खूप गरजेचे आहे.जर तुम्ही सांगितलेल्या तत्वांचे पालन केल्यास मोहरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जर का योग्य  पध्दतीने शेती ची मशागत आणि जमिनीत ओलावा  असल्यास  मोहरी लवकर उगवून येते. आणि पीक लवकर वाढीस लागते.रब्बी हंगामात मोहरी पेरणीसाठी सुधारित बियाणांचा उपयोग करणे आवश्यक आहे. सुधारित मोहरीचे  वाण  आरएच  725, आरएच 0749, आरएच 30 या बियाणांची पेरणी करावी. जर का पेरणी क्षेत्र हे बागायत क्षेत्र असेल तर एकरी 1.5 किलो बियाणे पेरावे.आणि जिरायत शेतीसाठी एकरी 2 किलो याप्रमाणें बियाणांची पेरणी करावी. पेरणी च्या आधी मोहरीच्या बियानाला कार्बिंडिझम हे औषध मिसळावे. हे औषध मिसळल्यामुळे मोहरीची उगवण क्षमता वाढते आणि रोगराई पासून पिकाचे रक्षण होते.

मोहरी ची नियोनबध्द पेरणी:-

मोहरी हे एक रब्बी हंगामातील महत्वाचे आणि बक्कळ नफा मिळवून देणारे पीक आहे. पेरणी करताना दोन्ही रोपांतील अंतर हे 10 ते 15 सेंमीे एवढे असावे. आणि दोन ओळीतले अंतर हे 30 सेंमी एवढे असायला हवे. या पिकाची योग्य वाढ करुन जास्त उत्पन्न घेऊन कमी खर्चात अधिकचे उत्पादन शेतकरी घेऊ शकतो.

खत किती वापरावे:

कोणत्याही पीकाला सर्वात उत्तम खत म्हणजे शेणखत आहे. मोहरीच्या पेरणीच्या आधी 1 एकरला 6 टन एवढे शेण खत शेतामध्ये टाकणे गरजेचे आहे.शेणखताचा वापर  करून  त्यासोबतच 35 किलो डीएपी, 25 किलो युरिया आणि 10 किलो झिंक सल्फेट तसेच 70 किलो युरिया आणि 75 किलो सिंगल सुपरफॉस्फेट या खतांचा वापर करन गरजेचे आहे. तसेच मोहरी पिकावर रोगराई सुद्धा कमी प्रमाणात असते त्यामुळं पाण्याला पीक जपल्यावर आणि योग्य शेतीची मशागत करून मोहरीचे बक्कळ उत्पन्न आपण मिळवू शकतो.

English Summary: Learn mustard crop in rabbi Mustard sowing guide
Published on: 21 October 2021, 01:33 IST