Agripedia

अनेक शेतकर्यांना सेंद्रीय व जैविक बद्दल बोलताना गोंधळलेले पाहीलेले आहे.

Updated on 04 April, 2022 8:15 PM IST

अनेक शेतकर्यांना सेंद्रीय व जैविक बद्दल बोलताना गोंधळलेले पाहीलेले आहे. एवढेच काय तर अनेक तज्ञ मंडळी सूद्धा याबाबत उलटसूलट मते नोंदवितात यामूळे शेतकर्यांच्या गोंधळात अधिक भर पडते. 

     त्यावेळी ९९% शेतकर्यांचा गोंधळ उडतो. काय कारण आहे. मित्रहो याबाबतचे अज्ञान आपला लाखोंचा तोटा करून शकते,हजारो एकर बागा व शेती नापिक करून टाकलीय या गोंधळामूळे. रासायनिक शेतीने जेवढे नूकसान केले त्यापेक्षा जास्त नूकसान सेंद्रिय , जैविक मधील अज्ञानामूळे होत आहे. आज रासायनिक शेतीचे तोटे लक्षात येवू लागल्याने शेतकरी ओरगॅनिक चा पर्याय शोधत आहेत.

अशा वेळी शेतकर्यांकडे शास्रिय माहीती असने आवश्यक आहे नाहीतर आगीतून उठून फूफाट्यात गेल्यासारखी अवस्था आहे. 

  मार्केटमध्ये शेकडो कंपन्या.तात्पूरता फायदा देनारे प्रोडक्ट विकतात. अनेकदा त्याची शूद्धता ५०% एवढी कमी असते. 

  ओरगॅनिक प्रोडक्ट मध्ये गुणवत्ता व क्वालीटी साठी कोणतेही कायदेशीर मापदंड नसल्यामूळे ओरीजनल काय व डूप्लिकेट काय हे कळेपर्यंत ते प्रोडक्ट मार्केट मधून गायब झालेले असते. 

   सिविड, ह्यूमिक ॲसिड, अमिनो ॲसिड , ग्लूकोनेटेड खते व एंझाईम्स सोडून मार्केटमध्ये काहीही नाही

सेंद्रीय च्या नावाखाली या प्रोडक्टचा सर्रास वापर केला जातो , ओरगॅनिक म्हनून केवळ रिझल्ट मिळताहेत म्हनून किंवा कमीशन मिळते आहे म्हनून प्रचार करनारे अनेक लोक आहेत परंतू त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार केला जात नाही. मित्रहो. आता आपन महत्त्वाचा विषय समजून घेऊ. 

सेंद्रिय शेती म्हनजे काय ?

 सजिवांचे ( वनस्पती, प्राणी , पक्षी व सूक्ष्मजिव ) उत्सर्जीत पदार्थ व त्यांचे जिवंत वा मृत अवशेष आणि खाणींतून मिळनारी नैसर्गिक पदार्थ यांचा ज्या शेतीमध्ये निविष्ठांसाठी वापर होतो तिला सेंद्रीय शेती असे म्हनतात. 

    उदा. शेणखत, कंपोस्ट, मासळी खत, पेंडीखत, पोल्ट्री खत, खाणीतील खनिज पदार्थ ( चूना , बेंटोनाइट वगैरे) , सेंद्रीय खते झाडपाल्यांचे अर्क , तेल, सीवीड अशी मोठी यादी करता येइल.

  मित्रहो. सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशके व बूरशीनाशके १००% प्रतिबंधित असतात 

  तर रासायनिक खते नियंत्रित केलेली आहेत. ९९% शेतकर्यांना हे माहीतच नाही की रासायनिक खते काही प्रमाणात चालतात. 

 आता आपन पाहूया. जैविक शेती म्हनजे काय?

ज्या पद्धतीमध्ये जिवानू कल्चरचा शेतीसाठी खत व औषधे म्हनून उपयोग केला जातो तिला जैविक शेती म्हनतात.

   एन पी के बॅक्टेरिया , ट्रायकोडर्मा , सूडो ,बॅसीलस व व्हॅम ( VAM ) अशी काही ठळक यादी करता येईल. 

    हे जिवाणू व फंगस मित्रजिव म्हनून काम करतात , खते उपलब्ध करने, रोग नियंत्रीत करने , शत्रू किटक नष्ट करने असे कार्य हे जिव करतात. 

  मग यांची उपलब्धता व्हावी यासाठी लॅबमध्ये वाढविलेले कल्चर , स्लर्या, वेस्ट डिकंपोझर किंवा जिवाणू वृद्धीसाठी फरमेंटेशन करन्याच्या विविध पद्धती. शेतकरी वापरतात. 

मित्रहो , हे जिव आहेत म्हनजे यांना अन्न लागनार ... यांचे अन्न आहे ह्यूमस कूजलेले सेंद्रीय पदार्थ ज्याला ओरगॅनिक मॅटर असे म्हनतात. त्यातील ओरगॅनिक कार्बन यांचे अन्न आहें. मग शेतकर्यांनी जमिनित ओरगॅनिक कार्बन वाढविला तर यांची संख्या जमिनितच झपाट्याने वाढेल पण तसे होत नाही कारण आज जमिनीत OC चे प्रमाण ०.५ % च्या आसपास म्हनजे वाळवंट झालेले आहे. 

  मित्रहो केवळ तात्पूरत्या मिळनार्या रिझल्टच्या मागे न धावता शाश्रिय पद्धतीने शेती केल्यास माफक खर्चात खूप चांगले पोषन उपलब्ध करता येवू शकते . त्यामूळे कोणतेही ओरगॅनिक प्रोडक्ट वापरण्यापूर्वी त्यातील घटक व कार्यपद्धतीचा अभ्यास करने ही काळाची गरज आहे. 

   जर OC ह्यूमस वाढला तरच जमिन पून्हा सजिव होऊ शकते. ह्यूमस कमी असलेल्या सेंद्रिय पदार्थांवर अवलंबून रहाणे हेही कूपोषनाचे प्रमुख कारण आहे. व कूपोषनच पूढे जावून रोगराई व समस्यांना आमंत्रण देते .

 हे का व कसे घडतेय.

  मित्रहो. निट लक्षपूर्वक वाचा.

जर जमिनित सेंद्रिय पदार्थच ( ओरगॅनिक मॅटर) नसतील किंवा असूनही त्यात पूरेसा (OC)ओरगॅनिक कार्बन नसेल तर हे जिवाणू कसे जगतील? 

English Summary: Learn more about the organic and biological mess in your mind
Published on: 04 April 2022, 08:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)