Agripedia

एरंड (इंग्लिश : Castor; लॅटिन : Ricinus communis) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

Updated on 18 June, 2022 8:12 PM IST

एरंड (इंग्लिश : Castor; लॅटिन : Ricinus communis) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. एरंडाच्या बियांना एरंडी म्हणतात. बियांपासून तेल काढतात.उत्पत्तीस्थान -भारत, चीन, ब्राझील, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण आफ्रिका आदी देशात एरंड ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. जगात एरंडाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यात एरंडाची लागवड प्रामुख्याने केली जाते.वर्णन - एरंड हे झाड साधारण २ ते ४ मीटरपर्यंत उंच वाढणारे असते. हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते. याची पाने, बिया, मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो.

पाने - हिरवट-तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात.फळ - दोन भागांनी बनलेले, आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ काटे असतात.बिया - काळ्या धुरकट रंगाची त्यावर पांढऱ्या रेषा, ठिपके असतात. यांना एरंडी म्हणतात.प्रकार - पांढरा - यात दोन उपप्रकार आहेत अ) लहान - याच्या बियांचे तेल व मूळ औषधांत वापरतात. ब) मोठा - याची पाने औषधात वापरतात.तांबडा - याचे तेल अधिक तीव्र असते, विशेष औषधांत वापरतात.आयुष्यानुसार प्रकार - वर्षायू - साधारण एक वर्षापर्यंत जगणारे लहान आकाराचे झाड.दीर्घवर्षायू - बरीच वर्षे जगणारे, मोठ्या आकाराचे बी व फळे असणारे झाड.

उत्पत्तीस्थान -भारत, चीन, ब्राझील, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण आफ्रिका आदी देशात एरंड ही वनस्पती प्रामुख्याने आढळते. जगात एरंडाचे सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्यात एरंडाची लागवड प्रामुख्याने केली जाते.वर्णन - एरंड हे झाड साधारण २ ते ४ मीटरपर्यंत उंच वाढणारे असते. हे झाड रानटी अवस्थेत आढळते तसेच याची शेतात लागवड केली जाते. याची पाने, बिया, मूळ आणि तेल यांचा औषधी उपयोग केला जातो.पाने - हिरवट-तांबड्या रंगाची बोटांप्रमाणे लांब आणि टोकदार असतात.

चवीनुसार प्रकार गोड, कडू.उपयोग - एरंडचा प्रामुख्याने चेता-मज्जा-नाडी संस्था (Nervous system), श्वसन संस्था (Respiratory system), पचन संस्था (Digestive system), रक्त वहन संस्था (Circulatory system), मूत्र वहन संस्था (Urinary system), प्रजनन संस्था (Reproductive system) आणि त्वचा (Skin) यासाठी उपयोग होतो.वातविकार, कावीळ, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, मूळव्याध, अजीर्ण, आमवात-संधिवात, उदरशूल, योनिशूल, मेदोरोग, हत्तीरोग, सर्प विष, अन्य विष, सूज येणे, कृमि होणे, झोप न येणे, पायाची आग होणे

English Summary: Learn more about castor
Published on: 18 June 2022, 08:11 IST