Agripedia

पीक संरक्षणात वापरण्यात येणाऱ्या अनेक बुरशीनाशकांमध्ये बोर्डो मिश्रणाचे स्थान अग्रगण्य आहे.

Updated on 24 July, 2022 4:46 PM IST

पीक संरक्षणात वापरण्यात येणाऱ्या अनेक बुरशीनाशकांमध्ये बोर्डो मिश्रणाचे स्थान अग्रगण्य आहे. फ्रान्समधील बोर्डो या विद्यापीठातून या मिश्रणाचा शोध लागला. म्हणून त्याला बोर्डो मिश्रण असे म्हणतात. फ्रान्समध्ये १८७८ च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर केवडारोग (डावणी मिल्डू) उद्‍भवला होता त्यावेळी वरीलमिश्रण फवारलेल्या बागांतील द्राक्षवेलींची पाने रोगमुक्तराहिल्याचे वनस्पतिशास्त्रचे प्रोफेसर मिलार्डेट यांना आढळले. मोरचूद व चुना या मिश्रणामुळे रोगाला आळाबसला असावा असा त्यांनी निष्कर्ष काढला. त्यानंतरबोर्डो मिश्रणाचा बुरशीनाशक म्हणून मोठ्या प्रमाणावरप्रसार झाला, अशा प्रकारे बोर्डो मिश्रणाचा शोध सन१८८२ मध्ये मिलार्डेट या शास्त्रज्ञाने फ्रान्समधील बोर्डो याविद्यापीठात लावला. बोर्डो मिश्रण तयार

करण्यासाठीमोरचूद, कळीचा चुना व पाणी यांची आवश्यकता असते. पिकाच्या अवस्थेनुसार सर्वसाधारणपणे १ टक्का, ०.९टक्का, ०.८ टक्का, ०.६ टक्का, ०.५ टक्का, व ०.४ टक्कातीव्रतेचे बोर्डो मिश्रण वापरतात. पण लहान व नाजूकरोपांवर सौम्य अश्या कमी तीव्रतेचे मिश्रण वापरतात.बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत- बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी मोरचूद ठराविकप्रमाणात वजन करून घेऊन पाण्यात विरघळावे. हे द्रावणधातूच्या भांड्यात न करता यासाठी लाकडी टीप, मातीचीभांडी किंवा प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करावा. बोर्डोमिश्रण तयार करण्याकरिता धातूची भांडी वापरू नयेत. १% बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी १ किलो मोरचुद, १किलो कळीचा चुना १०० लीटर पाणी वापरावे, याप्रमाणेमोरचुद एक किलो घेवून ते प्लास्टिकच्या बादलीत पाच लिटर

पाणी घेवून भिजवावे आणि वेगळ्या प्लास्टिक चे बादलीत पुन्हा पाच लिटर पाणी घेवून त्यात कळीचा चुनाभिजवावा मोरचूद व चुना पूर्ण भिजल्यावर हे मिश्रण गाळून घ्यावे . मोरचुदाचे द्रावण व चुन्याचे द्रावण एकाचवेळी तिसरऱ्‍या प्लास्टिकच्या भांड्यात ओतून त्यानंतर त्यामध्ये हे मिश्रण १०० लिटर होईल इतके पाणी घालावे. मिश्रण तयार झाल्यावर त्याच दिवशी वापरावे. भविष्यातील वापराकरिता बोर्डो मिश्रण तयार करूनकिंवा साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे बोर्डो मिश्रणाचावापर तयार केल्यापासून १२ तासांच्या आत करावा.Bordeaux mixture should be used within 12 hours of preparation.तसेच वापरण्यापूर्वी ते रासायनिक दृष्ट्या उदासीन आहेयाची खात्री करावी.मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी - मिश्रण फवारणीच्या वेळी फडक्‍यातून किंवा बारीकचाळणीतून गाळून घ्यावे. मोरचूद विरघळण्यास उशीरलागतो, म्हणून फवारणी करण्याच्या दोन ते तीन तासअगोदर ते पाण्यात

विरघळत ठेवावे. मोरचूद कापडीपिशवीत घेऊन लोंबकळत ठेवावे. तसेच मिश्रणकरतेवेळी तिसऱ्या भांड्यात दोन्ही द्रावण ओतताना प्रथमचुन्याचे आणि पाठोपाठ मोरचुदाचे द्रावण ओतून मिश्रणसारखे ढवळावे. एकदा तयार केलेले मिश्रण त्याच दिवशीवापरावे.बोर्डो मिश्रणाची चाचणी - बोर्डो मिश्रणाची, तीव्रता तसेच सामू (पीएच) या दोनअत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत.बोर्डो मिश्रणाचा रंग आकाशी असावा तसेच सामूउदासीन (७.००) असावा. तयार केलेल्या मिश्रणाचीचाचणी निळा लिटमस पेपरने घ्यावी. निळा लिटमस पेपरद्रावणात बुडविल्यानंतर जर लाल झाला तर मिश्रणातअधिक मोरचूद आहे किंवा द्रावण आम्ल आहे असेसमजावे. मिश्रणातील जास्त मोरचूद नाहीसे करण्यासाठीमिश्रणात परत चुन्याचे द्रावण निळा लिटमस पेपर निळाचराहीपर्यंत टाकावे. चाचणीची दुसरी पद्धत म्हणजे तयारमिश्रणात लोखंडी खिळा किंवा सळई दहा सें.मी. द्रावणात

बुडविले असता त्यावर तांबूस रंग चढला तर(तांबडा दिसणारा थर तांब्याचे सूक्ष्म कण जमून झालेलाअसतो) द्रावण फवारण्यास योग्य नाही असे समजून थोडीथोडी चुन्याची निवळी ओतावी. ही निवळी ओतण्याचीक्रिया लोखंडी खिळा किंवा सळई यावर जमणारा तांबडाथर नाहीसा होईपर्यंत करावी म्हणजे मिश्रण फवारण्यासयोग्य होईल.बोर्डो मिश्रणाचा उपयोग - बोर्डो मिश्रण हे अल्प किंमतीमध्ये तयार होणारे,वापरण्यास बिनधोक व बऱ्‍याच रोगांवर उपयुक्त आहे., रोपांचे मृत्यू, बटाट्यावरील करपा, द्राक्षावरील तंतुभुरी,लिंबावरील खैरा, भुईमुगावरील टिक्का, पानवेली, टोमॅटो, हळद, इत्यादींच्या पानांवरील ठिपक्यांच्या रोगावर तेवापरतात. फळ धारणेच्या वेळी बोर्डो मिश्रण फवारताना काळजी घेणे आवश्यक आहे.काही वेळा त्याच्या फवारण्यामुळे काही फळावर परिणाम दिसू शकतो . काही पाश्चात्य देशांत मात्र निर्जलित बोर्डो मिश्रण तयारमिळते.

 

लेखक : - डॉ. अमोल विजय शितोळे (पी. एच. डी. कृषि) डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला.

 माहिती संकलन - Mr.SATISH BHOSALE

Mob No:09762064141

Email: satish2157.bhosale@gmail.com

English Summary: Learn important and special facts about Bordeaux blends
Published on: 24 July 2022, 04:46 IST