Agripedia

पिवळे व चिकट सापळे हे मुख्यत: रसशोषक किडी नियंत्रनाचे काम करतात. पिवळा चिकट सापळा:-पांढरी माशी,मावा,तुडतुडे हे कीटक आकर्षित होतात. निळा चिकट सापळा:-फुलकिडे(थ्रीप्स),नागअळीचे पतंग,चौकोनी टिपक्यांचे पतंग हे कीटक आकर्षित होतात.

Updated on 04 October, 2021 10:05 AM IST

एकरी किमान 30 ते 40 चिकट सापळे लावले जातात. सर्व पिकामध्ये आपण या सापळ्यांचा वापर करू शकतो. एखाद्यावेळी कांद्यासारख्या पिकामध्ये फुलकिड्यांचा(थ्रीप्स) नियंत्रणासाठी 60 ते 80 निळे चिकट सापळे लावावे लागतात.

 रसशोषक किडी पिकातील हरितद्रव्य शोषून घेतात त्यामुळे पिकाची आंतरिक प्रक्रिया खालावून किट इतर रोगांना बळी पडते. तसेच पांढरी माशी,मावा,थ्रीप्स, हे कीटक विषाणूजन्य रोगांचे वाहक म्हणून काम करतात. त्यामुळे विषाणूजनीत रोग पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पसरवले जातात. उदा. मिरची मध्ये येणारा चुरडा-मुरडा,भेंडी मध्ये येणारा येल्लो व्हेन मोझ्याक,वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये येणारा कुकुरबीट मोझ्याक व्हायरस,

हे विषाणूजन्य रोग पिकाची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यानंतर पिकात शिरकाव करतात. जेव्हा रसशोषक कीड जसे पांढरी माशी एखाद्या रोगग्रस्त झाडातील रस शोषते आणि तीच माशी पुन्हा उडत जाऊन नवीन निरोगी झाडातील रस शोषते तेव्हा विषाणू हा रोगी झाडाकडून निरोगी झाडाकडे संक्रमित होतो. हे सर्व काही मिनिटामध्ये घडत असते त्यामुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार झपाट्याने होतो.

पीकाच्या सुरवाती पासून जेव्हा आपण पिवळे व निळे चिकट सापळे लावतो तेव्हा मावा,तुडतुडे,पांढरी माशी,थ्रीप्स यांचा बंदोबस्त करत असतो. तसेच विषाणूजन्य रोग पिकामध्ये पसरवन्या पासून रोखले जातात. त्यासाठी होणारा कीटकनाशकांवरील फवारणी खर्च वाचतो.त्यामुळे पिवळे व निळे चिकट सापळे किट व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावतात.

लेखक- महेश कदम,हातकणंगले

गोविंद गवळी,सावंतवाडी

संकलन- IPM SCHOOL

 

English Summary: Learn how yellow and blue sticky traps work in pest control
Published on: 04 October 2021, 10:05 IST