Agripedia

शेतकरी बांधवानो जर आपणास कमी खर्चात जास्त उत्पादन प्राप्त करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज आपण लेमनग्रास लागवडीविषयी जाणुन घेणार आहोत. लेमनग्रास एक औषधी वनस्पती आहे आणि याची लागवड अगदी कमी खर्चात केली जाऊ शकते. आपण याची लागवड मात्र विचार रुपयात करू शकता आणि यातून वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई करू शकता. सध्या औषधी वनस्पती लागवडीवर शेतकरी बांधव जोर देताना दिसत आहेत, औषधी वनस्पती लागवड करणे हे तुलनेने सोपे असल्याने शिवाय यातून उत्पादन देखील अधिक मिळत असल्याने शेतकरी बांधव औषधी वनस्पती लागवडीकडे वळताना दिसत आहेत. आज आपण लेमनग्रास या औषधी वनस्पतीच्या लागवडी विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या औषधी वनस्पतीच्या लागवडीविषयी.

Updated on 29 December, 2021 3:14 PM IST
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील लेमन ग्रास लागवडीविषयी आपल्या मन की बात या कार्यक्रमात याचा उल्लेख केला होता. माननीय मोदी यांनी सांगितले होते की देशातील अनेक शेतकरी लेमनग्रास लागवड करून चांगले उत्पादन अर्जित करीत आहेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करू बघत आहेत."

शेतकरी बांधवानो जर आपणास कमी खर्चात जास्त उत्पादन प्राप्त करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज आपण लेमनग्रास लागवडीविषयी जाणुन घेणार आहोत. लेमनग्रास एक औषधी वनस्पती आहे आणि याची लागवड अगदी कमी खर्चात केली जाऊ शकते. आपण याची लागवड मात्र विचार रुपयात करू शकता आणि यातून वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई करू शकता. सध्या औषधी वनस्पती लागवडीवर शेतकरी बांधव जोर देताना दिसत आहेत, औषधी वनस्पती लागवड करणे हे तुलनेने सोपे असल्याने शिवाय यातून उत्पादन देखील अधिक मिळत असल्याने शेतकरी बांधव औषधी वनस्पती लागवडीकडे  वळताना दिसत आहेत. आज आपण लेमनग्रास या औषधी वनस्पतीच्या लागवडी विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या औषधी वनस्पतीच्या लागवडीविषयी.

नरेंद्र मोदी यांनी केला होता लेमनग्रास शेतीचा उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील लेमन ग्रास लागवडीविषयी आपल्या मन की बात या कार्यक्रमात याचा उल्लेख केला होता. माननीय मोदी यांनी सांगितले होते की देशातील अनेक शेतकरी लेमनग्रास लागवड करून चांगले उत्पादन अर्जित करीत आहेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करू बघत आहेत. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लेमन ग्रासची शेती ही विशेषता त्याच्यापासून मिळणाऱ्या तेलासाठी केले जाते. लेमन ग्रास पासून मिळणाऱ्या तेलाचा उपयोग कॉस्मेटिक, साबुन, तेल, औषधे इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. या कारणास्तव लेमनग्रास तेलाला बाजारात मोठी मागणी असते शिवाय याला चांगला दर देखील बाजारात मिळतो. लेमन ग्रासची लागवड ही कोरडवाहू जमिनीत तसेच दुष्काळी भागात देखील केले जाऊ शकते. लेमन ग्रास ची लागवड करून आपण हेक्टरी चार लाखापर्यंत उत्पन्न कमवू शकता. लेमन ग्रास च्या लागवडीत कुठल्याही खताचा वापर केला जात नाही. तसेच लेमनग्रास पिकाला जंगली पशु देखील हानी पोहचवत नाही. लेमनग्रासची एकदा लागवड केली की यातून सहा वर्षेपर्यंत उत्पादन सहज घेता येते.

केव्हा करणार लेमनग्रास लागवड

लेमन ग्रास लागवड करण्यासाठी सर्वोत्तम काळ हा फेब्रुवारी ते जुलै या महिन्यातील समजला जातो. या पिकाची एकदा लागवड केली की याची सहा ते सात तास टाईम काढणी होते. एका वर्षात या पिकाची चारदा काढणी होते. लेमन ग्रास लागवड केल्यानंतर सुमारे पाच महिन्यानंतर याची पहिली काढणी केली जाते. लेमन ग्रास ची काढणी नेमकी केव्हा करायची हे जर समजत नसेल तर आपण लेमनग्रासचा एक छोटासा भाग तोडून त्याचा वास घ्यायचा जर वास हा लिंबासारखा येत असेल तर समजून घ्यायचं की हे पिक काढणीसाठी तयार झाले आहे.

किती होणार कमाई

जर आपण एक हेक्‍टर क्षेत्रात लेमनग्रास लागवड करत असाल तर आपणास सुमारे 20 हजार ते 40 हजार रुपयापर्यंत लागवडीसाठी खर्च येऊ शकतो. एकदा लेमनग्रास लागवड केली की वर्षातून चार वेळेस याची काढणी केली जाऊ शकते. मेंथाच्या लागवडी प्रमाणेच लेमनग्रासची देखील लागवड केली जाते. लेमनग्रासच्या एक हेक्‍टर क्षेत्रातून एका वर्षात सुमारे साडेतीनशे लिटर लेमनग्रासचे तेल मिळते. लेमन ग्रासची बाजारात बाराशे ते पंधराशे रुपये लिटर किंमत असते, यावरून हे स्पष्ट होते की एका हेक्टर क्षेत्रात लेमनग्रासची लागवड केली असेल तर आपणास पाच ते सहा लाख रुपयांची कमाई होऊ शकते.

English Summary: learn how to cultivate this crop by spending 20000 and earn 7 lakh
Published on: 29 December 2021, 03:14 IST