लसूण घास हे द्विदलवर्गीय चारा पिकांपैकी महत्त्वाचे पीक आहे. बहुवार्षिक पिकापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात. लसूण घासाचे पीक हे वेगवेगळ्या जमिनीत घेता येते. अगदी मध्यम प्रतीच्या, वाळू मिश्रित, पोयटायुक्त जमिनीपासून ते काळ्या कसदार जमिनीपर्यंतच्या भिन्न प्रकारात या पिकाची लागवड केली जाते.
भारी जमीन या पिकास अतिशय उपयुक्त ठरते. निचरायुकत जमीन यासाठी गरजेची असते. परंतु अल्काधर्मी जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी अयोग्य ठरतात. कारण अशा जमिनीत बियाची उगवणक्षमता एकसारखी होत नाही आणि त्यामुळे जमिनच्या क्षेत्रात ठिक-ठिकाणी लसूण घासाच्या पिकाच्या डाली/नांग्या पडतात. त्यामुळे उत्पादनात पुढे घट येण्याच्या संभव असतो. लसूणघासाचे पीक विभिन्न प्रकारच्या हवामानात येते तसेच हे पीक उबदार व थंड हवामानाच्या परदेशीतही चांगल्याप्रकारे लागवडीखाली आणता येते.
परंतु थंड व कोरड्या हवामानाच्या भागात लसूण घासाचे पीक कमी जास्त प्रमाणात वाढीस लागते. लसूण घास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. या चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, २.० टक्के स्निग्धांश, २५ टक्के काष्ठमय तंतू, २९ टक्के कर्बोदके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, उपयुक्त आम्ले तसेच अ आणि ड जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे.
पुर्व मशागत :
एकदा पेरणी केल्यानंतर हे पीक त्याच जमिनीत ३ ते ४ वर्षे राहत असल्याने पुर्व मशागतीला फार महत्त्व आहे. त्यासाठी खोलवर नांगरट करून ढेकळांचे प्रमाण अधिक असल्यास ती फोडून घेऊन उभ्या आडव्या कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. बी पेरणीपुर्वी मध्यम ते हलक्या जमिनीत एकरी ८ ते १० टन पुर्ण कुजलेले शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० ते १५० किलो द्यावे. जमीन भारी असल्यास कल्पतरू सेंद्रिय खत ५० ते ७५ किलो द्यावे. शेणखत कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास कल्पतरू सेंद्रिय खताची १ ते २ बॅगा जमिनीच्या प्रकारानुसार जादा द्याव्यात.
बीजप्रक्रिया :
लसूण घासाचे बी निवडताना ते भेसळ नसणारे, न फुटलेले, टपोरे, रोगमुक्त निवडावे. १ लि. पाण्यामध्ये २५ -३० मिली जर्मिनेटर घेऊन त्या द्रवाणात १ किलो बी ४ ते ५ तास भिजवून नंतर सावलीत सुकवून पेरावे. हे पीक वार्षिक आणि बहुवार्षिक असे दोन्ही पद्धतीमध्ये घेतले जाते. लसूणघासाची पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबरचा पहिला आठवडा या कालावधीत करणे फायदेशीर ठरते. एकरी सर्वसाधारणपणे ८ ते १० किलो बी पुरेसे होते. वरील पद्धतीने बीजप्रक्रिया केल्यास बियाण्यामध्ये अजून बचत होते. बी फोकूनही लसूणघास लागवडीखाली आणता येतो.
सुधारित जाती :
लसूण घासाच्या सुधारित जाती म्हणून प्रामुख्याने सिरसा -९ स्थानिक, पुन -१ बी, ल्युसर्न – ९ , आर. एल. -८८, आनंद -२, आनंद -३ जातींची शिफारस करण्यात येते.
खते : लसूणघासाच्या कमी दिवसात चांगल्या उत्पादनासाठी पेरणीपुर्वी वर सांगितल्याप्रमाणे खताचा वापर करावा. नंतर पहिल्या कापणीनंतर दर कापणीस २० ते २५ किलो कल्पतरू सेंद्रिय खताचा प्रति एकरी वापर करावा. म्हणजे कापणीनंतर निघणार्या फुटव्यांची वाढ जोमाने होईल. लसूणघासाच्या मुळावर नत्रस्थिरीकरणाच्या गाठी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वेगळी नत्राची मात्रा देण्याची गरज भासत नाही. वर्षानुवर्षे लसूणघासाचे पीक चाऱ्यासाठी मुबलकपणे घ्यावयाचे झाल्यास दर वर्षी ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात पालाश युक्त सेंद्रिय खत ४० किलो किंवा कल्पतरू सेंद्रिय खताची ५० किलोची १ बॅग एकरी द्यावी. म्हणजे लसूणघासाचे उत्पादन तर वाढीस लागतेच तसेच जमिनीचा पोतदेखील सुपीक राहण्यास मदत होते.
पाणी पुरवठा :
लसूणघासाचे पीक हे वर्षभर हिरवा चारा पुरविणारे पीक असल्याने पाणी पुरविण्याची सोय वेळच्या वेळी करणे अतिशय महत्त्वाचे असते. लसूणघासाला साधारणपणे १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या दिल्या पाहिजेत. उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, तर हिवाळ्यात १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.
लसूणघासाची कमी कालावधीत अधिक वाढ होण्यासाठी तसेच चारा पौष्टिक, हिरवागार, रसरशीत तयार होण्यासाठी खालील फवारण्या द्याव्यात.
पहिली फवारणी : ( लसूणघास उगवून आल्यानंतर ८ – १० दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २०० मिली. + क्रॉंपशाईनर २०० मिली.+ प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + १०० लि.पाणी.
दुसरी फवारणी : (उगवणीनंतर १८ ते २१ दिवसांनी) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ४०० मिली. + क्रॉंपशाईनर ४०० मिली. + राईपनर १५० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.
तिसरी फवारणी : (उगवणीनंतर २८ ते ३० दिवसांनी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर २५० मिली.+ प्रिझम २५० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + हार्मोनी १५० मिली + १५० लि.पाणी.
लसूणघासाची पाने रुंद, हिरवीगार, लुसलुशीत होऊन लसूणघासाची काडी मऊ, रसदार पौष्टिक तयार होते. त्यामुळे असा घासा दुभत्या जनावरांना खाण्यास दिल्याने दुधाचे प्रमाण वाढते व त्यातील स्निग्धांशाचेही प्रमाण वाढते.
एरवी लसूणघासाची पाने अरुंद व निस्तेज राहतात. तसेच लसूणघासाची काडी कडक राहिल्याने रसाचे प्रमाण कमी असते. असा चार फक्त घोडेच चांगला रवंथ करू शकतात.लसूण घासाचे पीक प्रथम कापणीस साधारणपणे ४५ ते ५० दिवसात येते. फुलोऱ्यात येण्यापुर्वीच लसूण घासाची कापणी करावी. त्यानंतर वरील दुसरी फवारणी कापणीनंतर ८ दिवसांनी आणि तिसरी फवारणी कापणीनंतर १५ दिवसांनी नियमित केल्यास १८ ते २२ दिवसात कापणीयोग्य घास प्रत्येक वेळी तयार होतो.
उत्पन्न :
लसूण घासाचे वार्षिक एकरी उत्पादन ४० ते ५० टन मिळते व औषधांचा व खतांचा वापर वरीलप्रमाणे नियमित केल्यास उत्पादनात यापेक्षाही वाढ होते तसेच सदैव पौष्टिक, हिरवागार चार मुबलक व जास्तीत जास्त प्रमाणात मिळतो.
Published on: 24 March 2021, 10:24 IST