Agripedia

बुरशीला स्वतःचे पोषण करण्यासाठी झाडात असलेली अन्नद्रव्ये खाणे गरजेचे असते . हीच अन्नद्रव्ये खाऊन बुरशीची वाढ होत असते . मात्र , बुरशीचा झाडावर नेमका कसा प्रादुर्भाव होतो याचे एक विशिष्ट प्रकारचे चक्र असते . ते कसे काम करते हे पाहूया :

Updated on 05 July, 2021 7:25 AM IST

बुरशीला स्वतःचे पोषण करण्यासाठी झाडात असलेली अन्नद्रव्ये खाणे गरजेचे असते . हीच अन्नद्रव्ये खाऊन बुरशीची वाढ होत असते . मात्र , बुरशीचा झाडावर नेमका कसा प्रादुर्भाव होतो याचे एक विशिष्ट प्रकारचे चक्र असते . ते कसे काम करते हे पाहूया :

१ ) वातावरणात बुरशीचे बीजाणू ( स्पोअर्स ) असतातच. हे बीजाणू झाडाच्या पानावर येऊन बसतात . ही फक्त एक सुरुवात असते.
पानावर स्थिर झाल्यानंतर ही बुरशी एक चिकट पदार्थ बाहेर टाकते , ज्यामुळे हे बीजाणू पानाला घट्ट चिकटून बसतात . परिणामी , जोरदार पावसातदेखील ही बुरशी पानापासून वेगळी होऊ शकत नाही .

३ ) यानंतर बुरशीची वाढ सुरू होते . सर्वप्रथम हे बीजाणू पानातील पाणी घ्यायला सुरुवात करतात . बियांपासून जसे अंकुर फुटतात तशाच पध्दतीने बुरशीच्या बीजाणू पासून बुरशीचा जन्म होतो. या नवीनच जन्म झालेल्या बुरशीला अन्नाची फार गरज असते. ही बुरशी अन्न मिळवण्यासाठी बारीक धाग्यांसारखे तंतू ( hyphae ) इतस्ततः पसरवण्यास सुरुवात करतात. हे तंतू विशिष्ट प्रकारचे द्रव बाहेर टाकतात, जेणेकरून झाडाचा तो भाग बुरशीसाठी खाण्यायोग्य होईल. यामुळे झाडाला मोठ्या प्रमाणात इजा होते.

 

४ ) त्यानंतर हे तंतू झाडाच्या आतील भागांत प्रवेश करून हल्ला करतात. एखादी जखम किंवा पर्णछिद्रे यामधून देखील ते तंतू प्रवेश करतात. यानंतर ही बुरशी पेशींच्या आत किंवा दोन पेशींच्या मधील भागातून वेगाने वाढायला सुरुवात होते. यालाच आपण बुरशीचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग झाला असे म्हणतो.
५ ) यानंतर हीच बुरशी नवीन बीजाणू तयार करते आणि हे बीजाणू पानाच्या पृष्ठभागावर देखील तयार होतात. हेच बीजाणू पुन्हा हवेद्वारे इतरत्र उडून नवीन झाडांवर हल्ला करतात.

 

दरम्यान हे चक्र असेच सुरू राहते . म्हणून आपल्याकडे बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास ती बुरशी कोणत्या अवस्थेला आहे याचा विचार करून स्पर्शजन्य की आंतरप्रवाही यापैकी कोणते ( किंवा दोन्हीही ) बुरशीनाशक वापरावे. विचार करून काम केल्यास आपले काम अतिशय प्रभावी होईल व अनावश्यक फवारणी चे पैसेही वाचतील.

अधिक माहितीसाठी फोन करा
9822606382

संदर्भ - इंटरनेट
गोपाल उगले

English Summary: Learn how fungus affects trees
Published on: 05 July 2021, 07:25 IST